इबेरिया द्वीपकल्प

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इबेरिया द्वीपकल्पाचे उपग्रहाद्वारे टिपलेले छायाचित्र

इबेरिया द्वीपकल्प (स्पॅनिश:Península Ibérica, península hispánica किंवा península hespérica), (IPA:\ī-ˈbir-ē-ə\) हा नैऋत्य युरोपातला द्वीपकल्प आहे.


[संपादन] इतिहास

[संपादन] नावाची व्युत्पत्ती

हा शब्द प्रथम ग्रीकांनी वापरला. रोमन ज्या भागाला हिस्पानिया म्हणत होते त्याच भागाला ग्रीक ’इबेरिया’ म्हणून ओळखत. रोमनपूर्व काळात या भागात राहणा-या लोकांच्या स्थानिक भाषेत नदीसाठी जो शब्द वापरला जात होता त्यातून ’इबर’ या शब्दाचा उगम झाला असावा असे मानले जाते. या द्वीपकल्पातल्या सर्वात मोठ्या नदीला रोमनांनी इबर नदी (Iberus Flumen; सध्याची एब्रो नदी) असे नाव दिले. तसेच सध्याच्या उएल्वा राज्यात इबेरोस नावाचे एक गाव असल्याचा आणि या गावाजवळून वाहणारी इबेरुस नावाची एक नदी असल्याचा उल्लेख प्राचीन दस्तावेजांमध्ये सापडतो. त्यामुळे इबेर नदीचा प्रदेश म्हणून या द्वीपकल्पास इबेरिया नाव मिळाले असावे.

वैयक्‍तिक साधने