आँग सान सू क्यी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

चित्र:Aung San Suu Kyi.jpg
आँग सान सू क्यी

आँग सान सू क्यी जन्म १९ जून १९४५, रंगून ह्या बर्मा ध्वज म्यानमार  देशाच्या निर्वाचित पंतप्रधान, नॅशनल लीग फॉर डेमॉक्रसी पक्षाच्या अध्यक्षा व बर्मामधील लोकशाहीवादी चळवळीच्या कार्यरत नेत्या आहेत. सू क्यी ह्यांना १९९१ साली नोबेल शांतता पुरस्कार बहाल करण्यात आला. १९९२ साली भारत सरकारने त्यांनी म्यानमारमधील लष्करी जुलुमशाही राजवटीविरुद्ध चालवलेल्या अहिंसा चळवळीसाठी त्यांना जवाहरलाल नेहरु शांतता पुरस्कार देउन गौरवले.

त्यांचे नाव तीन वेगवेगळ्या नावांच्या आधारावर आहे, आँग सान हे वडिलांकडून, क्यी हे आईकडून तर सू हे आजीच्या नावातून आले आहे.