अलेक्झांडर फ्लेमिंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
अलेक्झांडर फ्लेमिंग

अलेक्झांडर फ्लेमिंग
जन्म अलेक्झांडर फ्लेमिंग
६ ऑगस्ट इ.स. १८८१
लोकफेल्ड, स्कॉटलँड
मृत्यू ११ मार्च इ.स. १९५५
लंडन
राष्ट्रीयत्व स्कॉटिश
पेशा वैद्यकीय
पुरस्कार नोबेल पारितोषिक इ.स. १९४५
स्वाक्षरी


सर अलेक्झांडर फ्लेमिंग हे ब्रिटनचे जीवशास्त्रज्ञ, औषधतज्ञ होते. (जन्म ६ ऑगस्ट १८८१ - म्रुत्यु ११ मार्च १९५५). त्यांनी केलेल्या पेनिसिलीन च्या शोधाबद्दल व त्याचा प्रतिजैविक म्हणून वापराच्या शोधाबद्दल त्यांना १९४५ मध्ये नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले.[१] त्यांच्या या शोधाने वैद्यकक्षेत्रात प्रतिजैविकांचे युग चालू झाले व त्यामुळे अनेक अवघड जीवघेण्या रोगांवर मात करणे शक्य झाले. त्यांच्या पेनिसिलीनच्या शोधाबद्दल कहाणी प्रसिद्ध आहे. त्यांनी जीवाणूंचे ताटलीमध्ये कल्चर तयार केले होते. या कल्चरमध्ये चूकून पेनिसिलिन नामक बुरशी येउन पडली व त्यामुळे जीवाणूंचे संपूर्ण कल्चर मृत झाले. आपले श्रम वाया गेले म्हणून फ्लेमिंग ती ताटली फेकून देणार होते. परंतु त्याचवेळेस हे कल्चर का मृत झाले याबद्दल जीज्ञासा निर्माण झाली व पेनिसिलीन ही बुरशी जीवाणूंसाठी मरण आहे हे लक्षात आले व प्रतिजैविकांचा शोध लागला.

फ्लेमिंग यांनी जीवाणूशास्त्र, केमोथेरेपी यांवरती अनेक पुस्तके प्रकाशित केली आहेत.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. "The Nobel Prize in Physiology or Medicine 1945" [वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक १९४५] (इंग्रजी मजकूर). Nobelprize.org. १९ ऑक्टोबर २०१३ रोजी पाहिले.