अभिषेक बच्चन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अभिषेक बच्चन

अभिषेक बच्चन २००७ आय.आय.एफ.ए. पुरस्कार समारंभात
जन्म ५ फेब्रुवारी, १९७६ (1976-02-05) (वय: ३८)
मुंबई, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय, निर्माता
कारकीर्दीचा काळ २००० - चालू
भाषा हिंदी
वडील अमिताभ बच्चन
आई जया बच्चन
पत्नी ऐश्वर्या राय
अपत्ये आराध्या बच्चन
वडील अमिताभ बच्चन व आई जया बच्चन सोबत अभिषेक
पत्नी ऐश्वर्या राय सोबत अभिषेक

अभिषेक बच्चन (जन्म: ५ फेब्रुवारी १९७६) हा भारतामधील एक आघाडीचा सिने-अभिनेता व निर्माता आहे. बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चनजया बच्चन ह्यांचा मुलगा असलेल्या अभिषेकने २००० सालच्या रेफ्युजी ह्या चित्रपटामधून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरूवात केली. तेव्हापासून त्याने अनेक यशस्वी हिंदी चित्रपटांमध्ये कामे केली आहेत व त्याला ३ फिल्मफेअर पुरस्कार, १ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार इत्यादी अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

माजी मिस वर्ल्ड विजेती व बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री ऐश्वर्या राय ही अभिषेक बच्चनची पत्नी आहे. त्यांच्या जोडीला सिने-जगतात अभिवर्या ह्या टोपणनावाने ओळखले जाते.

चित्रपट कारकीर्द[संपादन]

वर्ष शीर्षक टीपा
2000 रेफ्युजी
2000 धाई अक्षर प्रेम के
2000 तेरा जादू चल गया
2001 बस इतना सा ख्वाब है
2002 हां मैने भी प्यार किया
2002 शरारत
2002 ओम जय जगदीश
2002 देश बंगाली चित्रपट
2003 मुंबई से आया मेरा दोस्त
2003 मैं प्रेम की दिवानी हूं
2003 कुछ ना कहो
2003 जमीन
2003 एल.ओ.सी. कारगिल
2004 रन
2004 युवा फिल्मफेअर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता पुरस्कार
2004 धूम
2004 फिर मिलेंगे
2004 नाच
2005 बंटी और बबली
2005 सरकार फिल्मफेअर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता पुरस्कार
2005 दस
2005 अंतर लहल बंगाली चित्रपट
2005 ब्लफमास्टर
2006 कभी अलविदा ना कहना फिल्मफेअर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता पुरस्कार
2006 उमराव जान
2006 धूम २
2007 गुरू
2007 झूम बराबर झूम
2008 सरकार राज
2008 द्रोणा
2008 दोस्ताना
2009 दिल्ली 6
2009 पा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
2010 रावण
2010 खेलें हम जी जान से
2011 गेम
2011 दम मारो दम
2012 प्लेयर्स
2012 बोल बच्चन
2013 धूम ३
2014 हॅपी न्यू इयर चित्रण सुरू

बाह्य दुवे[संपादन]