अफगाणिस्तानातील महिला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अफगाणिस्तानातील महिला
काबूल मधील महिलांचा गट, 2006
१९६३ मधील अफगाणिस्तानचे टपाल तिकीट, एका अफगाण स्त्रीचे पारंपारिक वस्त्रांमधील चित्रण
सामान्य सांख्यिकी
माता मृत्यू दर (प्रति १,००,०००) ४६० (२०१०)
संसदेतील महिला २७.६% (२०१२)
माध्यमिक शिक्षणासह २५ वर्ष पेक्षा जास्त महिला ५.८% (२०१०)
कामगार शक्ती मध्ये महिला २३% (२०१९)[१]
लिंग असमानता निर्देशांक
मूल्य ०.७१२ (२०१२)
स्थान १४७
वैश्विक लिंगभेद निर्देशांक
मूल्य NR (२०१२)
स्थान NR

अफगाणिस्तानातील महिलांच्या हक्कांमध्ये संपूर्ण इतिहासात विविधता आहे. स.न. १९६४ च्या घटनेनुसार महिलांना अधिकृतपणे समानता मिळाली.[२] तथापि, हे अधिकार १९९० च्या दशकातील गृहयुद्धाच्या वेळी तालिबान सारख्या वेगवेगळ्या तात्पुरत्या शासकांद्वारे काढून घेण्यात आले. विशेषतः नंतरच्या राजवटीत, स्त्रियांना स्वातंत्र्य फारच कमी दिले होते. विशेषतः नागरी स्वातंत्र्याच्या बाबतीत तर फारच कमी दिसून येते. २००१ च्या उत्तरार्धात तालिबानी राजवटी काढून टाकल्यापासून, इस्लामिक रिपब्लिक ऑफ अफगाणिस्तान[३][४] अंतर्गत महिलांच्या हक्कांमध्ये हळूहळू सुधारणा झाली आहे. स.न. २००४ मध्ये महिलांना पुन्हा एकदा पुरुषांच्या बरोबरीने अधिकार मिळाले. हे अधिकार संविधानानुसार, जे मुख्यत्वे १९६४ पासून होते, त्यावर आधारित दिले होते.[५] तथापि, शाळेच्या काही वर्गाद्वारे, विशेषतः ग्रामीण भागातील[६] स्त्रियांविषयीच्या प्रतिक्रियावादी दृष्टिकोनातून त्यांचे अधिकार अजूनही गुंतागुंतीचे आहेत. ही एक चिंतेची बाब आहे.[७] स.न. २०२१ मध्ये जेव्हापासून तालिबानने अफगाणिस्तानचा बहुतांश भाग ताब्यात घेतला तेव्हापासून देशातील महिलांच्या भविष्याबद्दल चिंता वाढली आहे.[८]

आढावा[संपादन]

अफगाणिस्तान दक्षिण आशियात स्थित आहे आणि त्याची लोकसंख्या सुमारे ३४ दशलक्ष आहे.[९] यापैकी १५ दशलक्ष पुरुष आणि १४.२ दशलक्ष महिला आहेत.[१०] सुमारे २२% अफगाण लोक शहरी आहेत आणि उर्वरित ७८% ग्रामीण भागात राहतात.[११] स्थानिक परंपरेचा भाग म्हणून, बहुतेक स्त्रियांनी हायस्कूल पूर्ण केल्यानंतर लगेच लग्न केले आहे. अनेकजण आयुष्यभर गृहिणी म्हणून जगतात.[१२]

इतिहास[संपादन]

अमानुल्ला खानच्या आधी[संपादन]

दुसऱ्या अँग्लो-अफगाण युद्धाच्या वेळीचे एका अफगाण मुलीचे छायाचित्र

दुर्रानी साम्राज्याच्या काळात (१४७४ - १८२३) आणि आरंभिक बाराकझाई राजवंशाच्या काळात अफगाणी स्त्रिया परंपरागतपणे पुरदह आणि पुरुषप्रधान रीतीरिवाजांनी लादलेल्या लिंगभेदाच्या परीस्थितीत राहत होत्या. सर्व अफगाणिस्तानात असे असतानाही, विविध क्षेत्रातील आणि वांशिक गटांमध्ये ही वागणूक काहीसी वेगळी होती. भटक्या स्त्रियांना, उदाहरणार्थ, त्यांचे चेहरे लपवावे लागत नव्हते आणि त्यांचे काही केस देखील दिसून येत होते. महिला समाजात कोणत्याही सार्वजनिक कामात भूमिका घेत नव्हत्या. परंतु समोर न येता (अज्ञातवासात) काही स्त्रिया कवी आणि ग्रंथकार बनल्या होत्या आणि त्यांच्या रचना प्रकाशित झाल्या होत्या.[१३]

अफगाणिस्तानातील राजांना चार अधिकृत बायका होत्या. परंतु स्वतःच्या फायद्यासाठी त्या राजांनी अनाधिकृत रित्या इतर स्त्रिया बाळगून होते.[१३] राजेशाही पद्धतीमध्ये राजाकडे मोठ्या प्रमाणात गुलाम महिला कनिझ आणि सुरती होत्या. या सर्व गुलामांना गुलाम बचा (नपुंसक) यांच्याद्वारे संरक्षित ठेवले जात होते.[१४] शाही हरमच्या काही स्त्रियांचा राज्याच्या कारभारावर शाही हरमच्या आतून प्रभाव होता. विशेषतः जरघोना अना, मिरमन आयशा आणि बाबो जान अशी काही स्त्रियांची नावे आहेत.[१५]

अमानुल्ला खान[संपादन]

1927 मध्ये अमानुल्ला खानच्या सुधारणा काळातील अफगाण महिला

अफगाणिस्तानातील काही राज्यकर्त्यांनी महिलांचे स्वातंत्र्य वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. बहुतांश भागांसाठी, हे प्रयत्न अयशस्वी ठरले. तथापि, असे काही नेते होते जे काही तात्पुरते बदल घडवून आणण्यास सक्षम ठरले. त्यापैकी पहिले राजा अमानुल्लाह होते, ज्यांनी १९१९ ते १९२९ पर्यंत राज्य केले आणि देशाचे एकीकरण आणि आधुनिकीकरणात काही लक्षणीय बदल केले.[१६] पितृसत्ताक कुटुंबांनी स्त्रियांवर लावलेले नियंत्रण कमी करण्यासाठी त्यांनी सार्वजनिक क्षेत्रात स्त्रियांच्या स्वातंत्र्याला प्रोत्साहन दिले. राजा अमानुल्लाह यांनी स्त्री शिक्षणाचे महत्त्व सांगितले. कुटुंबांना त्यांच्या मुलींना शाळेत पाठवण्यास प्रोत्साहित करण्याबरोबरच, त्यांनी महिलांच्या अनावरणाला प्रोत्साहन दिले आणि त्यांना अधिक पाश्चात्य शैलीच्या ड्रेसचा अवलंब करण्यास प्रवृत्त केले.[१७] स.न. १९२१ मध्ये, त्यांनी एक कायदा तयार केला आणि त्या मार्फत जबरदस्तीने विवाह, बालविवाह आणि वधूची किंमत देऊन केलेले लग्न अशा प्रथा रद्द केल्या. बहुपत्नीत्वावर निर्बंध घातले. त्यापूर्वी अफगाणिस्तान प्रदेशातील घरांमध्ये या सर्व सामान्य प्रथा होत्या.[१७]

शिक्षण[संपादन]

पश्चिम अफगाणिस्तानच्या हेरात शहरात असलेल्या हेरात विद्यापीठात इंटरनेट वापरणाऱ्या महिला विद्यार्थी.
समंगान प्रांतातील महिला विद्यार्थी (२००६)

गेल्या दशकात अफगाणिस्तानमधील शिक्षणात हळूहळू सुधारणा झाली आहे पण ती आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बरोबरीस आणण्यासाठी अजून बरेच काम करावे लागणार आहे. महिलांचा साक्षरता दर फक्त २४.२%आहे.[९] देशात सुमारे ९० लाख विद्यार्थी आहेत. यापैकी सुमारे ६०% पुरुष आणि ४०% महिला आहेत. देशभरातील विविध विद्यापीठांमध्ये १,७४,००० हून अधिक विद्यार्थी नोंदणीकृत आहेत. यापैकी सुमारे २१% महिला आहेत.[१८]

१९५० च्या उत्तरार्धात किंवा १९६० च्या सुरुवातीच्या काळात काबुल विद्यापीठातील जीवशास्त्र वर्ग.

खेळ[संपादन]

गेल्या दशकात, अफगाण महिलांनी फुटसल, फुटबॉल, बास्केटबॉल, स्कीइंग आणि इतर विविध खेळांमध्ये भाग घेत होत्या. स.न. २०१५ मध्ये अफगाणिस्तानने पहिली मॅरेथॉन आयोजित केली होती. संपूर्ण मॅरेथॉन धावणाऱ्यांमध्ये एक महिला होती, झैनाब, वय २५, जी अशा प्रकारे स्वतःच्या देशात मॅरेथॉनमध्ये धावणाऱ्या पहिल्या अफगाण महिला ठरल्या.[१९] स.न. २००४ मध्ये तालिबान राजवटीच्या पतनानंतर तीन वर्षांनी अफगाणिस्तानने महिला खेळाडूंना पहिल्यांदा ऑलिम्पिकमध्ये पाठवले. तेव्हापासून केवळ चार महिलांनी ऑलिम्पिकमध्ये अफगाण ध्वजाखाली भाग घेतला आहे.[२०]

लग्न आणि पालकत्व[संपादन]

१९३९ मध्ये हेरात प्रांतात आई आपल्या मुलासह
काबुलमध्ये मातृ दिनानिमित्त एक आई आपल्या मुलांसोबत

अफगाणिस्तानातील विवाह सहसा इस्लाम आणि अफगाणिस्तानच्या संस्कृतीनुसार होतात. अफगाणिस्तानमध्ये विवाहासाठी कायदेशीर वय १६ आहे.[२१] धार्मिक संप्रदाय, वांशिकता आणि आदिवासी संघटनेच्या आधारे अफगाणी एकमेकांशी विवाह करतात. सुन्नी पश्तून आणि शिया हजारा यांच्यात विवाह शक्यतो होते नाहीत. राष्ट्र एक पितृसत्ताक समाज आहे जिथे सामान्यतः असे मानले जाते की वडील पुरुषांना त्यांच्या कुटुंबासाठी निर्णय घेण्याचा अधिकार आहे.[२२] एक पुरुष तिच्या पत्नीला तिच्या संतीचीची वाट न पाहता घटस्फोट देऊ शकतो, तर उलट स्त्री असे करु शकत नाही.[२३]

फोटो गॅलरी[संपादन]

हे सुद्धा पहा[संपादन]

  • अफगाणिस्तान मध्ये लिंग भूमिका
  • अफगाण महिलांसाठी कायदा
  • अफगाणिस्तानात वेश्याव्यवसाय
  • अफगाणिस्तान मध्ये शेती मध्ये महिला
  • हुमिरा साकीब

संस्था:

  • अफगाण महिलांसाठी महिला
  • अफगाणिस्तानच्या महिलांची क्रांतीकारी संघटना
  • अफगाण महिला नेटवर्क
  • अफगाण महिला परिषद
  • अफगाण महिला व्यवसाय महासंघ
  • अफगाणिस्तान महिला राष्ट्रीय फुटबॉल संघ
  • अफगाणिस्तान राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ
  • रुखशाना मीडिया

सामान्य:

  • अफगाणिस्तान मध्ये मानवाधिकार
  • मुस्लिम बहुल देशांमध्ये मानवी हक्क
  • कुराण मध्ये मानवाधिकार
  • इस्लाममध्ये महिला
  • आशियातील महिला

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Labour force participation rate, female".
  2. ^ "An introduction to the constitutional law of Afghanistan" (PDF). Archived from the original (PDF) on 2022-05-10. 2019-12-05 रोजी पाहिले.
  3. ^ "Afghan forces could turn guns on Kabul without US air support, cash and troops, among other warnings". military times. 29 March 2019. 29 March 2019 रोजी पाहिले. Of 320 parliamentary seats, 63 are held by women; 68,000 Afghan women are school and university instructors. And another 6,000 serve as judges, prosecutors, defense attorneys, police and soldiers, according to SIGAR’s report.
  4. ^ "Afghan Girl Wins Reality Show For The First Time". TOLOnews. April 2, 2019. 2019-04-18 रोजी पाहिले.
  5. ^ Sultan, Masuda (14 January 2004). "Afghan Constitution a Partial Victory for Women". Women's eNews (इंग्रजी भाषेत). 2019-12-05 रोजी पाहिले.
  6. ^ "Women in Afghanistan - Norwegian Afghanistan Committee". www.afghanistan.no. Archived from the original on 2019-11-25. 2019-08-26 रोजी पाहिले.
  7. ^ Farrah Azeem Khan (December 5, 2018). "2018 Survey of Afghan People Shows Women's Rights are Complicated". Asia Foundation. 6 April 2019 रोजी पाहिले.
  8. ^ Yaroslav Trofimov (August 15, 2021). "Afghanistan Government Collapses as Taliban Take Kabul". The Wall Street Journal. August 16, 2021 रोजी पाहिले.
  9. ^ a b "Afghanistan". The World Factbook. www.cia.gov. 2017-12-01 रोजी पाहिले.
  10. ^ "Afghan Population 29.2 Million | Pajhwok Afghan News". www.pajhwok.com. 2019-01-12 रोजी पाहिले.
  11. ^ Mohammad Jawad Sharifzada, ed. (November 20, 2011). "Afghanistan's population reaches 26m". Pajhwok Afghan News. December 5, 2011 रोजी पाहिले.
  12. ^ "Working with Gender in Rural Afghanistan: Experiences from Norwegian-funded NGO projects" (PDF). www.cmi.no. September 2014. 2019-01-12 रोजी पाहिले.
  13. ^ a b Ismati, Masoma. ( 1987), The position and role of Afghan women ·in Afghan society, from the late 18th to the 19th century; Kabul
  14. ^ Emadi, Hafizullah, Repression, resistance, and women in Afghanistan, Praeger, Westport, Conn., 2002
  15. ^ Ismati, Masoma. (1987), The position and role of Afghan women ·in Afghan society, from the late 18th to the 19th century; Kabul
  16. ^ Keddie, Nikki R. (2007). Women in the Middle East. Princeton University Press. ISBN 978-0-691-12863-4.
  17. ^ a b Skaine, Rosemarie (23 September 2008). Women of Afghanistan In The Post-Taliban Era: How Lives Have Changed and Where They Stand Today. McFarland. ISBN 978-0-7864-3792-4.
  18. ^ "Education". United States Agency for International Development (USAID). Archived from the original on 2018-11-10. 2017-05-26 रोजी पाहिले.
  19. ^ "Feminist Daily News 10/29/2015: Afghan Woman Runs in Country's First Marathon". Feminist.org. 29 October 2015. Archived from the original on 2015-11-18. 2 November 2015 रोजी पाहिले.
  20. ^ O'Grady, Siobhán (July 1, 2019). "For Afghan women, competing in the Olympics is only part of the struggle".
  21. ^ "Afghanistan Has a Tougher Law on Child Marriage than Florida". Human Rights Watch. October 20, 2017. 2019-03-31 रोजी पाहिले. In Afghanistan, girls can marry at the age of 16, or they can marry at the age of 15 with permission from their fathers or a judge.
  22. ^ Hafizullah, Emadi (30 August 2002). Repression, Resistance, and Women in Afghanistan. Praeger. ISBN 978-0-275-97671-2.
  23. ^ "Divorce, suicide; 'Hell' in Herat". Golnar Motevalli. Revolutionary Association of the Women of Afghanistan. 23 July 2009. Archived from the original on 2021-09-09. 2021-09-09 रोजी पाहिले.

 

बाह्य दुवे[संपादन]