अँटोनियस पायस
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| अँटोनियस पायस | ||
|---|---|---|
| रोमन साम्राज्याचा १५ वा सम्राट | ||
| म्युनिक शहरात असलेला अँटोनियस पायसचा अर्धपुतळा | ||
| अधिकारकाळ | ११ जुलै, इ.स. १३८– ७ मार्च, इ.स. १६१ |
|
| जन्म | १९ सप्टेंबर, इ.स. ८६ | |
| लानुविअम, इटली | ||
| मृत्यू | ७ मार्च, इ.स. १६१ | |
| लोरीअम | ||
| पूर्वाधिकारी | हेड्रियान | |
| उत्तराधिकारी | मार्कस ऑरेलियस | |
| वडील | टायटस ऑरेलिअस फल्वस | |
| आई | आरिआ फॅदिल्ला | |
| इतर पत्नी | फाऊस्टीना | |
| संतती | फाऊस्टीना द यंगर | |
| राजघराणे | नेर्व्हा-अॅंटोनायन | |
अँटोनियस पायस (लॅटिन: Titus Aelius Hadrianus Antoninus Augustus Pius) (१९ सप्टेंबर, इ.स. ८६ - ७ मार्च, इ.स. १६१) हा रोमन साम्राज्याचा १५ वा सम्राट होता.
पार्श्वभूमी [संपादन]
हेड्रियान या रोमन सम्राटाने आपल्या मृत्यूपूर्वी अँटोनियस पायस याला आपला वारस निवडले. अँटोनियस पायस हा प्राचीन नेर्व्हा-अॅंटोनायन वंशातील होता. याचा जन्म लानुविअम जवळ इ.स. ८६ साली झाला.[१] याच्या वडिलांचे नाव टायटस ऑरेलिअस फल्वस व आईचे नाव आरिआ फॅदिल्ला होते. याच्या आईने नंतर इ.स. ९८मध्ये प्युबिलस ज्युलिअस ल्युपस याच्याशी लग्न केले त्याच्यापासून तिला आरिआ ल्युपिला आणि ज्युलिआ फॅदिल्ला या दोन मुली झाल्या.
संदर्भ आणि नोंदी [संपादन]
- ↑ शूल्त्झ, सिलीआ ई.; हार्वे, पॉल बी. रिलीजन इन रिपब्लिकन इटली (हार्डबॅक), इ.स. २००६, केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस. आय.एस.बी.एन. १२३९७८-०-५२१-८६३६६-७. २ जून, २०१२ रोजी मिळवले. (इंग्रजी मजकूर)
|
|||||||