नांदेड-बिदर रेल्वेमार्ग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बिदर येथे अनेक ऐतिहासिक गुरुद्वारे आहेत, त्यामुळे नांदेडच्या तख्त सचखंड श्री हुजुर अबचलनगर साहिब गुरुद्वाऱ्याला भेट देणाऱ्या पर्यटकांना लगेच बिदरचा गुरू नानक झीरा साहिब गुरुद्वाऱ्याचे दर्शन होण्यासाठी तसेच बेंगळूरुचे अंतर कमी होण्यासाठी हा मार्ग महत्त्वाचा ठरतो. हुजूर साहेब नांदेड पासुन कर्नाटकमधील बिदर शहरापर्यंत हा लोहमार्ग पोहचतो. प्रस्तावित नांदेड-बिदर या नव्या रेल्वेमार्गाची एकूण लांबी १५७.०५० किमी असून त्यापैकी १००.७५ किमी मार्ग महाराष्ट्रातील आहे आणि उर्वरित ५६.३० किमी मार्ग कर्नाटकमध्ये आहे. या सरळ रेल्वेमार्गामुळे बिदर ते नांदेड हे अंतर १४५ किमीने कमी होईल.


  • लोहमार्गावरील प्रस्तावित स्थानके
  1. हुजूर साहेब नांदेड रेल्वे स्थानक
  2. मुगट जंक्शन रेल्वे स्थानक
  3. आमदूरा (मारतळा)
  4. कृष्णुर/कामळज (माळकौठा)
  5. नायगांव
  6. नरसी
  7. बेटमोगरा (माऊली)
  8. आदमपूर
  9. खानापूर जं.
  10. देगलूर
  11. करडखेड
  12. मरखेल
  13. हाणेगांव
  14. औराद
  15. संतपूर (हौदगाव)
  16. जानवाडा(धूपत-माणगांव)
  17. बालूर
  18. हलबर्गा
  19. बिदर