यांकी स्टेडियम
यांकी स्टेडियम अमेरिकेच्या हे न्यू यॉर्क शहरातील ब्रॉन्क्स येथे असलेले बेसबॉलचे मैदान आहे. मेजर लीग बेसबॉलच्या न्यू यॉर्क यांकीझ आणि मेजर लीग सॉकरच्या न्यू यॉर्क सिटी एफसीसाठी स्टेडियम हे घरचे मैदान आहे. या मैदानाची प्रेक्षकक्षमता सुमारे ५०,००० ते ५५,००० आहे.
याच्या बांधकामाला २.४ अब्ज डॉलर खर्च आला. यापैकी १.२ अब्ज डॉलर सार्वजनिक करांमधून गोळा केले गेले. आतापर्यंत बांधलेल्या सर्वात महागड्या मैदानांपैकी हे एक आहे. [१]
इतर खेळ[संपादन]
बेसबॉलखेरीज हे मैदान फुटबॉल, अमेरिकन फुटबॉल, मुष्टियुद्धाचे सामने आणि आइस हॉकी साठी वापरले जाते. येथे अनेकदा मोठ्या संगीत मैफलीही होतात.
संदर्भ[संपादन]
- ^ "NYC baseball stadium subsidies: Do I hear $1.8B?". Field of Schemes. Archived from the original on March 21, 2015. May 28, 2015 रोजी पाहिले.