कोलंबो क्रिकेट क्लब मैदान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कोलंबो क्रिकेट क्लब मैदान
मैदान माहिती
स्थान मेटलॅंड क्रिसेंट, कोलंबो
आसनक्षमता ६,०००
मालक कोलंबो क्रिकेट क्लब
यजमान श्रीलंका क्रिकेट
कोलंबो क्रिकेट क्लब

आंतरराष्ट्रीय माहिती
प्रथम क.सा. १४ मार्च १९८४:
श्रीलंका  वि. न्यूझीलंड
अंतिम क.सा. १६ एप्रिल १९८७:
श्रीलंका  वि. न्यूझीलंड
यजमान संघ माहिती
कोलंबो क्रिकेट क्लब (? - सद्य)
शेवटचा बदल २३ फेब्रुवारी २०१७
स्रोत: इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्लिश मजकूर)

कोलंबो क्रिकेट क्लब मैदान (CCCG; सिंहला: කොළඹ ක්‍රිකට් සමාජ ක්‍රීඩාංගනය, तमिळ: கொலோம்போ கிரிக்கெட் கிளப் கிரௌண்ட்) हे कोलंबो, श्रीलंका येथील एक बहुउपयोगी मैदान आहे. सध्या ते मुख्यत्वे स्थानिक प्रथम वर्गीय क्रिकेट सामन्यांसाठी आणि दौऱ्यावर आलेल्या संघांच्या सराव सामन्यांसाठी वापरले जाते. मैदानाची प्रेक्षक क्षमता ६,००० इतकी असून येथील पहिला कसोटी सामना १९८४ साली खेळवला गेला. हे जागातील सर्वात लहान मैदानांपैकी एक आहे. कोलंबो क्रिकेट क्लब मैदानावर आजवर तीन कसोटी सामने खेळवले गेले आहेत.[१]

मैदान[संपादन]

कोलंबो क्रिकेट क्लब मैदान हे श्रीलंकेतील सर्वात जुना प्रथम वर्गीय क्रिकेट क्लब, कोलंबो क्रिकेट क्लबचे होम ग्राउंड आहे. मेटलॅंड क्रिसेंट, कोलंबो येथील तीन मैदानांपैकी हे एक आहे. इतर दोन मैदानांमध्ये सिंहलीज स्पोर्ट्स क्लब मैदान आणि नॉनडिस्क्रीप्ट्स क्रिकेट क्लब मैदान ह्यांचा समावेश होतो.[२] श्रीलंकेतील लहान मैदानांपकी हे एक आहे, आणि त्याशिवाय हे जगातील सर्वात लहान कसोटी मैदानांपैकी एक आहे. कोलंबो क्रिकेट क्लब मैदान पूर्वी मेटलॅंड क्रिसेंट मैदान म्हणून ओळखले जात असे. [१][२]

मैदानातील जास्तीत जास्त जागा मुख्यतः खेळाच्या जागेने व्यापली आहे त्यामुळे सर्व बाजूंना प्रेक्षकांसाठी फारच कमी जागा शिल्लक आहे. मैदानाच्या एका बाजूला धावफलक आणि प्रेस बॉक्स सहीत कॉंक्रीटचा स्टॅंड आहे. ह्या एंडला प्रेस बॉक्स एंड असे नाव आहे. दुसऱ्या बाजूला पॅव्हिलियन एंड आहे तेथे मुख्य पॅव्हिलियन आहे. मैदानावर ६,००० प्रेक्षक बसू शकतात.[२]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ a b http://www.espncricinfo.com/srilanka/content/ground/59294.html क्रिकइन्फो
  2. ^ a b c "संग्रहित प्रत". Archived from the original on 2009-07-17. 2017-02-23 रोजी पाहिले. Unknown parameter |आर्काईव्ह दुवा= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काईव्ह दिनांक= ignored (सहाय्य)