Jump to content

हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या पानावरून पुनर्निर्देशित)


काकोरी कट प्रकरणात अटकेपासून स्वतःला दूर ठेवण्यात यशस्वी झालेले चंद्रशेखर आजाद हे हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन मधले एकमेव प्रमुख व्यक्ती होय. हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना सन 1928 मध्ये चंद्रशेखर आजाद यांनी केली. हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनला हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मी असेही संबोधले जाते. हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन ही संघटना म्हणजेच हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनचे नाव बदलून आणि त्यामध्ये समाजवादाचा अंतर्भाव निर्माण करून तयार झालेली संघटना होय. यामध्ये समाजवाद रोज होण्यामध्ये क्रांतिकारक शहीद भगतसिंग यांचा सिंहाचा वाटा होता.

काँग्रेसच्या गया अधिवेशनामध्ये महात्मा गांधी यांनी असहकार आंदोलन 1920 सली सुरू झाले होते आणि जरी हे आंदोलन अहिंसक असले तरी 1922 मध्ये चौरी चौरा येथे हिंसा घडून आले या घटनेमध्ये मारल्या गेलेल्या शेतकऱ्यांचा विचार न करता एकतर्फी मत बनवून महात्मा गांधीजींनी काँग्रेसच्या कोणत्याही कृती समितीतील सदस्य बरोबर सल्लामसलत न करता एकतर्फी असहकार आंदोलन माघार घेण्याचा निर्णय घेतला. आणि कोणत्याही मतांचा त्यांनी आदर न करता या गोष्टी केल्यामुळे काँग्रेस दोन गटात विभागली गेली. यामध्ये गांधीजींवर नाराज असणाऱ्या गटाने स्वराज्य पक्षाची स्थापना केली ज्याचे प्रमुख नेते हे मोतीलाल नेहरू व चित्तरंजन दास हे होते त्याच बरोबर गांधीजींवर नाराज झालेल्या तरुण मंडळींनी क्रांतिकारक संघटना स्थापन करण्याचा निर्णय घेतला याच मुळे हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना झाली.

9 ऑगस्ट 1925 रोजी हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनच्या क्रांतिकारकांनी काकोरी या ठिकाणी सरकारी खजिना घेऊन जात असलेल्या रेल्वेची लूट केली. काकोरी हे ठिकाण म्हणजेच लुटीचे ठिकाण लखनऊ पासून 14 मैल म्हणजे 23 किलोमीटर इतके लांब होते.या क्रांतिकारक कृतीमध्ये काही प्रवाशांचाही मृत्यू झाला.यानंतर यातील काही महत्त्वाच्या क्रांतिकारकांचा तपास घेऊन त्यांना अटक करण्यात आली व त्यांच्यावर खटले भरण्यात आले यामध्ये चार प्रमुख नेते अश्फाक उल्ला खान, राम प्रसाद बिस्मिल, रोशन सिंग आणि राजेंद्र लाहिरी यांना डिसेंबर 1927 मध्ये फाशी देण्यात आली तसेच आणखी सोळा जणांना दीर्घकालीन तुरुंगवासात धाडले. या खटल्यामध्ये हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनच्या क्रांतिकारकांनी देशभक्तीपर गीत खटला सुरू असताना गायले आणि आपल्या बचावाचे प्रयत्न केले परंतु ते निष्फळ ठरले आणि या खटल्यात नंतर हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन कमकुवत झाली.

चंद्रशेखर आजाद यांनी स्वतःला अटकेपासून दूर ठेवून हिंदुस्तान रिपब्लिकन आर्मीची स्थापना केली तसे त्याचे नाव भगतसिंग यांच्या पुढाकाराने हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन असे करण्यात आले.

क्रांतिकारक घटना

[संपादन]

साँडर्सला गोळ्या घालून ठार मारण्यात आले 1928 मध्ये भारतामध्ये आलेल्या सायमन कमिशन मध्ये हे एकही भारतीय नसल्यामुळे झालेल्या सायमन गो बॅक आंदोलनामध्ये लाहोरमध्ये लाला लाजपत राय यांनी नेतृत्व केले. परंतु पोलीस अधीक्षक जेम्स ए स्कॉट या अधिकाऱ्यांनी लाठीचार्ज करण्याचा आदेश दिला या लाठीचार्ज मध्ये लाला लजपत राय गंभीर स्वरूपात जखमी झाले. पुढे त्यातच त्यांचा मृत्यू 17 नोव्हेंबर 1928 मध्ये झाला. पंजाब केसरी लाला लजपतराय यांच्या मृत्यूचा बदला घेण्याची प्रतिज्ञा भगतसिंग यांनी घेतली. त्यानुसार इतर क्रांतिकारी जसे की शिवराम राजगुरू, सुखदेव थापर आणि चंद्रशेखर आजाद यांच्या सोबत मिळून स्कॉट या अधीक्षकाला मारण्याचा कट आखण्यात आला. पण जेव्हा या कटाची अंमलबजावणी करण्याची वेळ आली तेव्हा मात्र चुकीने भगतसिंग यांनी समोर आलेल्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक जॉन साँडर्स याला गोळ्या घालून ठार मारण्यात आले या गोळ्या राजगुरू आणि भगतसिंग यांनी सन 1900 ते 28 दिनांक 17 डिसेंबर रोजी घातल्या होत्या. यावेळी चरण सिंग नावाच्या हवालदाराने मारेकऱ्यांचा पाटला केला परंतु चंद्रशेखर आझाद यांच्या गोळीबारा मध्ये तो जखमी झाला.

यानंतरचे हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशनचे महत्त्वाचे कार्य म्हणजे दिल्ली येथील केंद्रीय कायदे मंडळांमध्ये दिनांक 8 एप्रिल 1929 रोजी बॉम्बफेक. केंद्रीय कायदे मंडळाचे मध्ये क्रांतिकारी कृत्यांना पायबंद करण्यासाठी पब्लिक सेफ्टी अधिनियम आणि ट्रेड डिस्ट्रीब्यूटर डिस्ट्रीब्यूटर अधिनियम मांडले गेले होते त्यामुळेच आपले म्हणणे बहिर्याच्या कानावर घालण्यासाठी मोठा धमाका करण्यासाठी मोकळ्या बाकड्यावर भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी बॉम्ब फेकले तसेच बॉम्ब फेकीचे कारण सांगणारे पत्रक ही कायदे मंडळांमध्ये फेकण्यात आले जिद्द दुसऱ्यादिवशी हिंदुस्तान टाईम्स या वृत्तपत्रांमध्ये छापून ही आले यानंतर 15 एप्रिल 1929 रोजी पोलिसांनी छापा टाकून हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची बोंब फॅक्टरी लाहोर येथे शोधून काढून त्यामध्ये किशोरीलाल सुखदेव थापर आणि जय गोपाल यांना अटक केली या केंद्रीय कायदे मंडळातील बॉम्बे कीच्या केस मध्ये भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना 23 मार्च 1931 मध्ये फाशी देण्यात आली

यानंतर मात्र हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनला उतरती कळा लागली आणि त्याचे अनेक क्रांतिकारक अटकेत गेल्यामुळे संघटना तिडके झाली परंतु स्थानिक पातळीवर मात्र या संघटनेचा लढा 1936 पर्यंत चालू राहिल्याचा दिसून येतो.