सुमेध वडावाला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सुमेध वडावाला तथा मृत्युंजय श्रीकृष्ण रिसबूड हे एक मराठी लेखक आहेत.

पुस्तके[संपादन]

  • अनुभवंती (कथासंग्रह)
  • आई ती आईच (आत्मकथन, आठवणी)
  • काही काही माणसं! (कादंबरी)
  • चित्रं (कथासंग्रह)
  • तृष्णा (कादंबरी)
  • दोन चाकं झपाटलेली (प्रवासवर्णन)
  • थोरवी (माहितीपर)
  • धर्मयुद्ध (कथासंग्रह)
  • पुस्तक उघडलं (कथासंग्रह)
  • प्रदीप लोखंडे, पुणे- १३ (चरित्र)
  • बावन्‍नकशी (कथासंग्रह)
  • ब्रह्मकमळ (कादंबरी)
  • मनश्री (व्यक्तिचित्रण, या पुस्तकाला २००८-०९चा महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार मिळाला.)
  • मी, नंदा (आत्मचरित्र, सहलेखिका डॉ. नंदा केशव मेश्राम)
  • रुपाली रेळेची सागरी झेप : जल आक्रमिले
  • संदर्भासहित स्पष्टीकरण (कादंबरी)
  • सफाई (कादंबरी, सहलेखक - उत्तमकुमार जैन)
  • सांजवा (कथासंग्रह)
  • 'साठे' उत्तरांची कहाणी : नामवंत अर्थतज्ज्ञांचं वेधक आत्मकथन
  • सामक्षा (कथासंग्रह)
  • हेडहंटर - असे शोधले जातात कॉर्पोरेट जगतातले ’डिसिजन मेकर्स’

पुरस्कार आणि सन्मान[संपादन]

  • २००८-०९ सालचा महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार (मनश्री या कादंबरीला)
  • रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड येथे २० ऑक्टोबर २०१३ रोजी भरलेल्या एकदिवसीय ग्रामीण साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद
  • वत्सला बाळकृष्ण अंबाडे (लेखिका डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी यांच्या मातोश्री) यांच्या स्मरणार्थ दिला गेलेला साहित्य पुरस्कार (७ फेब्रुवारी २०१६)