साबरमती नदी
Appearance
साबरमती नदी भारताच्या गुजरात राज्यातून मुख्यत्वे वाहणारी नदी आहे.
एकूण ३७१ किमी लांबीच्या नदीचा उगम राजस्थान मधील अरवली पर्वतरांगेत आहे. अरवली रांगांच्या मेवाड टेकड्यांमध्ये साबर व हाथमती या नद्यांच्या संयुक्त प्रवाहानंतर तीला "साबरमती" असे म्हणले जाते. ही नदी राजस्थान व गुजरात या राज्यांमधून वाहणारी नदी आहे. ही नदी उत्तर - दक्षिण वाहते. शेवटी खंबातच्या आखातास जाऊन मिळते.