Jump to content

साबण्णा बुरूड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

साबण्णा भीमण्णा बुरूड हे पुण्यातील वाद्यांची दुरुस्ती करणारे एक कारागीर आहेत. तंत्रज्ञानाच्या आणि कोणत्याही यंत्राची मदत न घेता ते वाद्यांची हातानेच दुरुस्ती करतात. हार्मोनिअमपासून ऑर्गन, पायपेटी व सर्व तंतुवाद्यांची दुरुस्ती आणि नव्या कोऱ्या बाजाच्या पेटीची निर्मिती यांमध्ये त्यांचा हातखंडा आहे.

बुरूड यांना लहानपणी संगीत आवडत नसून नंतर त्यांना हिंदी चित्रपट संगीत आवडू लागले. पुढे ते या क्षेत्राकडे आले. २०१६ साली ७५ वर्षांचे झालेले साबण्णा इ.स. १९५६पासून वाद्यदुरुस्तीच्या व्यवसायात आहेत.

हे मूळचे कर्नाटक राज्यातील गुलबर्गा जिल्ह्यामधील बेळगेरी गावचे आहे. यांच्या घरातील व्यवसाय बुरूडगिरीचा होता. हे चार भावंडांमध्ये सर्वांत मोठे होते व त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी होती. ते एका हार्मोनियम व्यावसायिकाबरोबर पुण्यास आले. वाद्यांची दुरुस्ती शिकताना ते पुण्यात वाद्यांची विक्री करणाऱ्या मिरजकरांच्या दुकानात काम करू लागले. पुढे ते या व्यवसायासाठी मुंबईसे गेले. अनेकदा रस्त्यावरच मुक्काम करून त्यांनी काम चालविले. कलेत पारंगत झाल्यानंतर ते पुन्हा पुण्याला आले. एच. व्ही. मेहेंदळे यांच्या दुकानात काही वर्षे काम केल्यानंतर त्यांनी वडारवाडीतील आपल्या घरातच वाद्यदुरुस्तीचा व्यवसाय सुरू केला.

पुण्यातील बहुतेक सर्व संगीत कलावंत साबण्णा यांच्याकडूनच आपल्या वाद्यांची दुरूस्ती करून घेतात.

पुरस्कार

[संपादन]

अभिजात संगीताच्या प्रसारार्थ कार्यरत असलेल्या गानवर्धन संस्थेतर्फे वाद्यदुरुस्ती करणाऱ्या साबण्णा भीमण्णा बुरूड यांना वाद्य कारागीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. (१-१२-२०१६)