मावा (कीड)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मावा हा पिकांवर आढळणारा एक कीटक आहे.हा साधारणतः कापूस, करडई या पिकावर जास्त आढळतो. या कीटकामुळे कापसास चिकटा हा रोग होतो.इतर पिकांवरही याचा प्रादुर्भाव होतो.[१]

वर्णन[संपादन]

हा किडा सुमारे १ ते २ मिमी आकाराचा असून त्याचे शरीर मऊ असते.त्याचा रंग साधारणतः हिरवट,तपकिरी किंवा काळसर हिरवा असतो.हा कीटक चिकट व गोडसर पदार्थ आपल्या शरीरातून बाहेर टाकतो.हा द्रवपदार्थ खाण्यास मुंग्या त्या बाधित रोपावर जमा होतात.त्यांचे पाठीवर बसून माव्याची पिल्ले दुसऱ्या रोपट्यावर स्थलांतर करतात व त्यास बाधित करतात.[१]

प्रजनन[संपादन]

मावा मादीचे प्रजनन संयोगाविना होते.मादी सरासरीने १५ पिलांना जन्म देते.याची वाढ साधारणतः १ आठवड्यात पूर्ण होते.याच्या जगण्याची दर मर्यादा २ ते ३ हप्ते आहे.[१]

पिकांचे कोणत्या प्रकारचे नुकसान[संपादन]

हा कोवळ्या वनस्पतींवर जगणारा कीटक असल्यामुळे,वाढलेल्या झाडांपेक्षा कोवळ्या झाडांचे तो नुकसान अधिक करतो.हा पानाचे खालच्या बाजूस राहून त्याचा रसाचे शोषण करतो.त्यामुळे पिकांची पाने दुमडतात.वनस्पती करपतात.त्यांची वाढ नीट होत नाही.

कीटनियंत्रण[संपादन]

नैसर्गिक शत्रुंद्वारे कीटनियंत्रण[संपादन]

  • ladybug,
  • राख.

इतर उपाय[संपादन]

दशपर्णीचा नियमित वापर.

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]