"२४३ आयडा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: hy:(243) Իդա
छो r2.7.2) (Robot: Modifying pl:243 Ida to pl:(243) Ida
ओळ ४२: ओळ ४२:
[[nn:243 Ida]]
[[nn:243 Ida]]
[[no:243 Ida]]
[[no:243 Ida]]
[[pl:243 Ida]]
[[pl:(243) Ida]]
[[pt:243 Ida]]
[[pt:243 Ida]]
[[ro:Ida]]
[[ro:Ida]]

०२:२९, २३ फेब्रुवारी २०१३ ची आवृत्ती

गॅलिलिओ उपग्रहाद्वारा घेतलेले २४३ आयडा व त्याच्या डॅक्टिल या उपग्रहाचे छायाचित्र

२४३ आयडा हा लघुग्रहांच्या पट्ट्यातील एक लघुग्रह आहे. तो जोहान पॅलिसा याने १८८४ मध्ये शोधला. त्याचे नाव ग्रीक पुराणातील एका अप्सरेवरुन ठेवण्यात आले आहे. दुर्बिणीद्वारे केलेल्या पुढील निरीक्षणांद्वारे आयडा हा एस प्रकारचा लघुग्रह असल्याचे लक्षात आले आहे. गॅलिलिओ या यानाने २४३ आयडाला ऑगस्ट २८, १९९३ रोजी भेट दिली. उपग्रह असलेला हा पहिलाच लघुग्रह आहे तसेच अवकाशयानाने भेट दिला गेलेलाही हा दुसरा लघुग्रह आहे.

सर्व मुख्यपट्ट्यातील लघुग्रहांप्रमाणेच आयडाची कक्षा ही मंगळगुरू यांच्या मध्ये आहे. सूर्याभोवती कक्षेतून एक फेरी पूर्ण करण्यासाठी त्यास ४.८४ वर्षे लागतात तर स्वतःच्या अक्षाभोवती फिरण्यास त्याला ४.६३ तास लागतात. त्याचा आकार प्रमाणबद्ध नसून तो वाकडातिकडा आहे. आयडावर अनेक विवरे असून ती विविध आकारांची व वयाची आहेत.

आयडाचा उपग्रह, डॅक्टिलचा शोध ॲन हार्च या गॅलिलिओ उपग्रह मोहिमेच्या सभासदाने गॅलिलिओ उपग्रहाच्या छायाचित्रांचे विश्लेषण करुन लावला. त्याचे नाव डॅक्टिल्सवरुन ठेवण्यात आले. डॅक्टिल्स हे ग्रीक मिथकातील आयडा पर्वतावर राहणारे जीव होते. डॅक्टिलचा व्यास केवळ १.४ किलोमीटर (४,६०० फूट) असून तो आयडाच्या एकवीसांश आहे.

शोध व निरीक्षणे

आयडा सप्टेंबर २९, १८८४ रोजी ऑस्ट्रियन खगोलशास्त्रज्ञ जोहान पॅलिसा यांनी शोधून काढला. हा त्यांनी शोधलेला पंचेचाळीसावा लघुग्रह होता. आयडाचे नाव हे एक व्हिएतनामच्या मॉरिझ व्हॉन कफनर या हौशी खगोलशास्त्रज्ञाने ठेवले. ग्रीक पुराणात आयडा ही क्रीटवरील अप्सरा असून तिने झ्यूस या ग्रीक देवाला वाढवलेले असते. आयडा हा कोरोनिस गटातील एक लघुग्रह असल्याचे प्रथम कियोत्सुगु हिरायामा यांच्या प्रथम लक्षात आले.

आयडाच्या परावर्तन वर्णपटाचे मापन डेव्हिड थॉलन व एडवर्ड टेडेस्को यांनी एट-कलर ॲस्टेरॉइड सर्व्हे (अष्टरंगी लघुग्रह सर्वेक्षण) याअंतर्गत सप्टेंबर १६, १९८० रोजी केले. त्याचा वर्णपट एस प्रकारच्या लघुग्रहांशी जुळला. यु.एस. फ्लॅगस्टाफमधील नाविक वेधशाळा व ओक रिज वेधशाळा यांनी आयडाची अनेक निरीक्षणे घेतली. त्यामुळे आयडाच्या सूर्याभोवती फिरण्याच्या कक्षेसंबंधीची मापने सुधारली.

गॅलिलिओ अंतराळयान

आयडा लघुग्रहाजवळून गॅलिलिओ हे अंतराळयान १९९३ मध्ये गेले. हे यान खरेतर गुरूच्या मोहिमेवर निघाले होते. त्याच्या गास्प्रा व आयडा या लघुग्रहांना दिलेल्या भेटी दुय्यम स्थानावर होत्या. साचा:Link FA