विकिपीडिया:सदस्य नावांबद्दलचे धोरण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आपले सदस्य नाव बदलून मिळण्याबद्दल विनंत्या येत असतात. त्या स्वीकारण्यापूर्वी अथवा नाकारण्यापूर्वी, मराठी विकिपीडियावर ग्राह्य सदस्यनाव कसे असावे या विषयावर सदस्यांनी चर्चा करून सुयोग्य धोरणाकरिता सूचना मांडाव्यात.

सदस्य नाव संकेत[संपादन]

सदस्य:Hotel bhagwatpalace[संपादन]

सदस्य नाव काय असावे यावर कमीतकमी बंधने ठेवली जातात.मोठ्या विकिंना त्यावरही संकेत ठरवून घ्यावे लागले.मराठी विकिवर सदस्य:Hotel bhagwatpalace हे एक नवीन सदस्य नाव आले आहे. अशा प्रकारे Hotel bhagwatpalace या नावाने स्वतःचे पान स्वतःच बनवू नये असा संकेत आहेच, पण Hotel bhagwatpalace नावाचे सदस्य नाव असावे काय, इतर विकिंचे काय संकेत आहेत आणि मराठी विकिचा काय संकेत असावा हे ठरविणे अगत्याचे आहे. कारण हे सदस्य जेवढ्या चर्चा पानांवर जितक्या सह्या करतील तेवढ्या पानांवरून आपसूक त्यांची जाहिरात होणार आहे. अशा कृत्यांची गूगल महाराजही दखल घेतील. पण असेच जर इतरही सदस्यांनी करून मागितले तर चर्चा पाने जाहिरातींचे आखाडे होतील किंवा कसे ?
चर्चेत सहभागी होताना विकिपीडिया:हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा लेख वाचून घेतलेला असणे बरे ठरेल. :माहितगार १५:५२, ११ डिसेंबर २००९ (UTC)

सदस्य:Haramkhor[संपादन]

अशा प्रकारच्या सदस्य नावांची निर्मिती मराठी विकिपीडियावर आता पर्यंत सहसा झालेली नाही अथवा फारसा उपद्रव झालेला नाही प्रचालक परस्पर यास नियंत्रित करू शकतात,अशी खाते निर्मिती मुळापासनही थांबवता येऊ शकते.पण अजून काही सूचना असल्यास त्या विचारात घेता येतील.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ११:२२, ७ डिसेंबर २०१३ (IST)[reply]

हेसुद्धा पहा[संपादन]