वारकरी संगीत संमेलन
Appearance
संगीतोन्मेष संस्थेतर्फे अखिल भारतीय वारकरी संगीत संमेलन भरवले जाते.
- १ले वारकरी संगीत संमेलन २१ ते २३ नोव्हेंबर २००३ दरम्यान पुण्यात शनिवारवाड्यासमोर झाले होते. संमेलनाध्यक्ष किराणा घराण्याचे गायक पंडित यादवराज फड होते.
- २रे वारकरी संगीत संमेलन २४ ते २६ नोवेम्बर २००४ या काळात पंढरपूर येथे झाले होते.
- ६वे संमेलन पुणे विद्यापीठाच्या संत नामदेव सभागृह येथे ७-८ डिसेंबर २०१० या दिवशी झाले. बद्रिनाथ महाराज तनपुरे हे या संमेलनाचे अध्यक्ष होते.
- ७वे संमेलन २०१३साली १ ते ३ मार्च या दरम्यात, पुणे शहरात शनिवारवाड्यासमोरच्या पटांगणात झाले. संमेलनाध्यक्ष पंडित यादवराज फड होते.
- ११ वे अखिल भारतीय वारकरी संगीत संमेलन ४ नोव्हेंबर २०१६ साली खानदेश भागातील जळगाव जिल्ह्यात पार पडले.संगीतोन्मेष पुणे, सिद्धिविनायक मानव कल्याण मिशन,महाराष्ट्र राज्य आणि धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी यांच्या विद्यमाने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. संत साहित्यातील गाढे अभ्यासक तथा सुप्रसिद्ध लेखक स्वामी डॉ.तुळशीराम गुट्टे महाराज हे संमेलनाचे अध्यक्ष होते.
- भारतीय संगीत कलापीठ हे वारकरी संगीत परीक्षा अभ्यासक्रम राबविणारे सर्वप्रथम व एकमेव कलापीठ आहे.
पहा : साहित्य संमेलने