Jump to content

लिबर्टी आयलंड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Liberty Island photo D Ramey Logan
Statue of Liberty (Liberty Island)

माहिती

[संपादन]

न्यू यॉर्क येथील स्टॅच्यू ऑफ लिबर्टी म्हणजे स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा म्हणजे अमेरिकेचे राष्ट्रीय स्मारक. खरे तर अमेरिका कशी वसली, याचे हे ऐतिहासिक स्मारक आहे. या ठिकाणी एका मोठ्या हॉलमध्ये जगातील किती लोक, कोणत्या वर्षी आले हे एका नकाशाद्वारे, निरनिगळ्या रंगाचे स्तंभ रंगवून दाखवले आहे. तसेच पृथ्वीच्या गोलार्धावर हे लोक कोणत्या देशातून आले हेसुद्धा रंगाद्वारे दाखवले आहे. एलिस आयलंडचा इतिहास मोठा मनोरंजक आहे. हे बेट १८०८ साली वसले गेले. अमेरिकेच्या संरक्षणासाठी तेथे सैनिकी तळ उभारण्यात आला. नंतर १८३० पासून आर्यलड, ब्रिटन, जर्मनीतून लोक येऊ लागले. हे प्रमाण हळूहळू वाढत जाऊन रशिया, हंगेरी, इटली, इस्रायल, ऑस्ट्रेलिया अशा जगाच्या विविध भागांतून लोकांचे लोंढे त्या बेटावर समुद्राच्या मार्गाने पोहोचले आणि तेथून पुढे अमेरिकेत प्रवेश करू लागले. त्यामुळे अमेरिकेने ‘इमिग्रंट कोटा’ ठरवण्यासाठी कायदा केला. तेथे येणा-या लोकांचे लिंग, वय, उद्योग व आरोग्य याची नोंद करून, त्यांची वैद्यकीय तपासणी करून नंतरच त्यांना अमेरिकेत प्रवेश मिळत असे. या मार्गाने २५२ दशलक्ष लोक येथे पोहोचले. त्यावेळी आलेल्या लोकांचे कपडे, सामान, पेटय़ा, दागिने, पादत्राणे अजूनही व्यवस्थित मांडलेल्या आहेत. त्यांचे फोटोही तेथे लावलेले आहेत. धार्मिक, राजकीय, सामाजिक, आर्थिक अशा निरनिराळ्या कारणास्तव जगातल्या अनेक देशांतील लोक आपली मातृभूमी सोडून अमेरिकेत आले. पुढे अमेरिका हीच त्यांची कर्मभूमी व मातृभूमी झाली.

अमेरिका कशी वसली याचे हे ऐतिहासिक स्मारक आहे. या ठिकाणी एका मोठ्या हॉलमध्ये जगातील किती लोक, कोणत्या वर्षी आले हे एका नकाशाद्वारे त्यात निरनिगळ्या रंगाचे स्तंभ रंगवून दाखवले आहे. तसेच पृथ्वीच्या गोलार्धावर हे लोक कोणत्या देशातून आले हेसुद्धा रंगाद्वारे दाखवले आहे. त्यावरून भारतीय लोक १९५०-६० या दशकात प्रथम आले व पुढे त्यांचे प्रमाण वाढत गेले असे दिसते. १९८०-९० च्या दशकात हे प्रमाण सर्वात जास्त होते. इतर देशातून किती लोक, केव्हा आले हेसुद्धा आपल्याला तुलना करून पाहता येते. अमेरिकेला विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभला आहे. त्यामुळे येथे वेगवेगळ्या देशातील निरनिराळ्या दिशांनी लोकांनी स्थलांतर केले. या स्थलांतरीत लोकांनी अमेरिका वसवली, वाढवली व समृद्धही केली. आजची अमेरिका ही अनेक देशातील, वंशातील, भाषांतील व धर्मातील लोकांची बनली आहे. या सा-या लोकांना या देशाने सामावून घेतले आहे. त्यात भारतीयांचाही मोठा सहभाग आहे.

अमेरिकन इंग्रजीत स्पॅनिश, डच, चिनी, फ्रेंच असे अनेक भाषांतील शब्द येऊन बसले आहेत. जसे ‘टायफून, यांकी’ वगैरे. विविध देशांतून आलेल्या या लोकांनी अमेरिकेला आपलं मानलं. आज त्यांची दुसरी, तिसरी तर कधी चौथी पिढीही तेथे सुखाने नांदते आहे. येथे तुम्हाला ‘रेझिम’ दिसणार नाही. सर्वाना शिक्षणाच्या, नोकरीच्या, प्रगतीच्या समान संधी प्राप्त होतील, असे अधोरेखित करण्यात आले आहे. अनेक देशातील, वंशातील, धर्मातील इथे आलेल्या लोकांची मिळून एक निराळी अमेरिकन संस्कृती तयार झाली आहे; जी व्यक्तिस्वातंत्र्याचा सदैव पुरस्कार करते. म्हणूनच अमेरिकेत स्थलांतरीत झालेले भारतीय हाच आपला देश मानत असावेत. अमेरिकेची जडणघडण समजून घेण्यासाठी एलिस आयलंडची सहल खूप उपयोगी ठरली.

हे सुद्धा पहा

[संपादन]

http://www.touropia.com/tourist-attractions-in-the-usa/

http://traveltips.usatoday.com/famous-places-united-states-34852.html Archived 2017-05-06 at the Wayback Machine.

संदर्भ

[संपादन]

http://prahaar.in