Jump to content

राजीव नाईक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

राजीव नाईक हे एक मराठी भाषेतील लेखक आहेत. नाटककार आणि कथाकार म्हणून राजीव नाईक यांनी मराठी साहित्यात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. सुरुवातीला एकांकिका लिहिणारे राजीव नाईक यांच्या कथा ’अबकडई’, ’पूर्वा’, ’सत्यकथा’, ’हंस’ आदी नियतकालिकांतून प्रसिद्ध झाल्या आहेत.

राजीव नाईक ह्याचे ‘लागलेली नाटकं’ हे नाटकाच्या बाजूने केलेले लेखन आहे. ‘बाजू घेणारं’ नव्हे, बाजूने केलेले. हे पुस्तक अनेकार्थांनी खुले, प्रसरणशील असण्याची अनेक कारणे आहेत. खुद्द लेखक अनेक वाटांनी नाटकाकडे येत राहिले आहेत. भाषावैज्ञानिक म्हणून, सौन्दर्यमीमांसक म्हणून, तत्त्वचिंतक म्हणून, नाट्यलेखक म्हणून, नाट्यशिक्षक म्हणून त्यांना नाटक अनेक अर्थांनी लागलेले आहे. म्हणून वाचकांसाठीही हा वाचनाच्या अनुभवाचा उलगडा करणारा, जुनीच नाटके नव्या उजेडात समजून घेण्याचा, आपल्याला देखील नाटके कशी लागतात हे तपासून बघावे असे वाटण्याचा प्रवास असतो.

राजीव नाईकांना प्रत्येक नाटकाचा ‘स्व’भाव कसा घडला हे शोधण्याची अपार जिज्ञासा आहे. त्यांच्या व्यक्तित्वात जे-जे म्हणून प्रगल्भपणे जाणवणारं आहे, ते-ते सारे पणाला लावून त्यांनी ‘लागलेली नाटकं’ उलगडलंय. प्रसंगी अत्यंत कठोरपणे बुद्धिप्रामाण्य अवलंबणारं, पण नाटकाचं ‘लागणं’ दाखवताना प्रसंगी विद्ध-अलवार झालेलं हे लेखन आहे. ह्या लेखनात जसा मिश्कीलपणा आहे तसाच भेदक तिरकसपणाही आहे. पुन्हा हे सारं परस्परात नीट विरघळलेलं, हट्टाने डोकं वर काढून विघ्न न आणणारं आहे. अंतिमतः समजून घेऊ पाहाणाऱ्याला मदत करणारं आहे. अत्यंत संवादी, विश्वासार्ह आहे. कुठलंही चांगलं नाटक असंच असतं.मराठीत नाट्यविषयक लिखाण तसं विपूल आहे, पण बहुतेक सगळं नाट्यसंहितांची चिकित्सा करणारं, किंवा प्रयोगांच्या इतिहासाचा आढावा घेणारं. ‘नाटकातली चिन्ह’, ‘नाटकातलं मिथक’ ‘खेळ नाटकाचा’ आणि ‘ना नाटकाचा’ ह्या पुस्तकांमधून नाईकांनी शब्दसंहितेचं नाही तर नाट्यप्रयोगच्या घटकाचं सौंदर्य उलगडून दाखवणारं असं, खऱ्या अर्थानं रंगभूमीविषयक लिखाण केलं आहे. किंवा मराठीतल्या रंगभूमीविषय लिखाणाचा ओनामा त्यांनी केला आहे.एक सतेज सर्जनशील नाटककार अशी राजीव नाईकांची ओळख आहे. मानवी नातेबंधांचे अत्यंत मूलगामी भान मांडणारी आणि जगण्याच्या सतत उत्क्रांत होत जाणाऱ्या भोवतालात उकलत जाणारे जीवन समजून घेऊ पाहणारी नाटकं त्यांनी लिहिलेली आहेत. मानवी जीवनाला व्यापून राहणाऱ्या काळतत्त्वाचा विचार त्यांच्या नाट्यलेखनात विरघळून आलेला असतो. मानवी नात्यातल्या सूक्ष्म राजकारणाचा अन्वयही ते आपल्या नाटकांमधून लावू पाहतात. त्यांची जीवनविषयक भूमिकाही सातत्याने आधुनिक आणि पुरोगामी राहिलेली आहे.

अनाहत (१९८४), अखेरचं पर्व (१९९२) आणि जातक-नाटक (२०००,अमंचित) ही नाटकं सततची नाटकं ह्या संग्रहामध्ये एकत्रित प्रकाशित आहेत. ह्यानाटकांच्या अधेमधेही मी नाटकं लिहिली आहेत आणि तीदेखील आणखी दोन संग्रहांच्या रूपांत प्रकाशित होणार आहेत. त्यामुळे, हीच तीन नाटकं इथे एकत्रित का केली आहेत त्याचा थोडा खुलासा करावा आणि ज्या स्वरूप-वैशिष्ट्यांमुळे ती एका गटात पडतात त्याबद्दलही काही म्हणावं अशी श्री० श्री० पु० भागवत ह्यांनी सूचना केली.

ही तिन्ही नाटकं मिथक-आधारित आहेत. अनाहत ऋग्वेदातल्या तीन संवादांवर, अखेरचं पर्व महाभारतावर, तर जातक-नाटक दुर्गाबाई भागवतांनी"पैस "मधल्या 'आसन्नमरण काळी राणी' ह्या ललितलेखात ज्यांबद्दल लिहिलं आहे त्या अजिंठ्यातल्या दोन भित्तिचित्रांचा मूळ आधार असलेल्या जातक-कथांवर. 'मिथक-आधारित नाटक' असा शब्द वापरायचा तो 'पौराणिक नाटक' ह्या पठडीपासूनचा त्यांचा वेगळेपणा नोंदवण्यासाठी.कुठल्याही अर्थनिर्णयनाशिवाय आणि प्रामुख्याने रंजनासाठी एखाद्या पौराणिक कथेचा आधार घेतला असेल तर पौराणिक नाटक जन्माला येतं. उदाहरणार्थ, सौभद्र.अर्थात मुळातल्या कथेला मिथकाची परिमाणं आहेत की नाहीत हेही महत्त्वाचं आहे. पण तशी असली तरीही वेगळं अर्थनिर्णयन न करता वर उलेखलेला निखळ रंजनाचाच—किंवा फार तर प्रबोधनाचा हेतू बाळगला तरीहीपौराणिक नाटकच सिद्ध होतं. उदाहरणार्थ, विद्याहरण. हा हेतू बदलला,अर्थनिर्णयनाला महत्त्व मिळालं, की मग ह्याच मूळ स्रोतावर आधारितनाटकाला पौराणिक न म्हणता मिथक-आधारित म्हणावंसं वाटतं. उदाहरणार्थ,गिरीश कार्नाडांचं ययाती किंवा वि० वा. शिरवाडकरांचं ययाती आणिदेवयानी सुद्धा. मात्र अर्थनिर्णयनाच्या परी असतात हे लक्षात ठेवायला हवंआणि एखाद्या नाटकाचा तो प्रमुख हेतू आहे का, हेही.कर्नाडांच्या नाटकांचा उलेख होतोच आहे, तर त्यांच्या बऱ्याच नाटकांमध्ये आणि ह्या संग्रहातल्या नाटकांमध्ये असलेलं आणखी एक महत्त्वाचं साम्यआणि ती एकत्रित प्रकाशित करण्यामागचं एक कारणही.

कुठल्याही अर्थनिर्णयनाशिवाय आणि प्रामुख्याने रंजनासाठी एखाद्या पौराणिक कथेचाआधार घेतला असेल तर पौराणिक नाटक जन्माला येतं. उदाहरणार्थ, सौभद्र.कअर्थात मुळातल्या कथेला मिथकाची परिमाणं आहेत की नाहीत हेही महत्त्वाचं

आहे. पण तशी असली तरीही वेगळं अर्थनिर्णयन न करता वर उलेखलेला

निखळ रंजनाचाच—किंवा फार तर प्रबोधनाचा हेतू बाळगला तरीहीपौराणिक नाटकच सिद्ध होतं. उदाहरणार्थ, विद्याहरण. हा हेतू बदलला,अर्थनिर्णयनाला महत्त्व मिळालं, की मग ह्याच मूळ स्रोतावर आधारित

नाटकाला पौराणिक न म्हणता मिथक-आधारित म्हणावंसं वाटतं. उदाहरणार्थ,गिरीश कार्नाडांचं ययाती किंवा वि० वा. शिरवाडकरांचं ययाती आणि

देवयानी सुद्धा. मात्र अर्थनिर्णयनाच्या परी असतात हे लक्षात ठेवायला हवं

आणि एखाद्या नाटकाचा तो प्रमुख हेतू आहे का, हेही.

कार्नाडांच्या नाटकांचा उलेख होतोच आहे, तर त्यांच्या बऱ्याच नाटकांमध्ये आणि ह्या संग्रहातल्या नाटकांमध्ये असलेलं आणखी एक महत्त्वाचं साम्यआणि ती एकत्रित प्रकाशित करण्यामागचं एक कारणही)

राजीव नाईक यांची प्रकाशित पुस्तके

[संपादन]
  • अखेरचं पर्व (नाटक)
  • अनाहत (नाटक)
  • अवकाश न-नाटकाचा (नाट्यशास्त्रविषयक)
  • खेळ नाटकाचा (नाट्यशास्त्रविषयक)
  • नाटकातला काळ (नाट्यशास्त्रविषयक)
  • नाकातलं मिथक (नाट्यशास्त्रविषयक)
  • या साठेचं काय करायचं (नाटक) : हिंदी रूपांतर ‘इस कंबख्त साठे का क्या करे?’. अनुवादक ज्योती सुभाष.
  • वांधा (नाटक)
  • मराठी साहित्यात प्रायोगिक आणि नावीन्यपूर्ण लेखन करणाऱ्या लेखकाचा गौरव करण्यासाठी वासंती गंगाधर गाडगीळ विश्वस्त निधीतर्फे, इ.स.१९९४सालापासून दर तीन वर्षांनी, गंगाधर गाडगीळ साहित्य पुरस्कार दिला जातो. इ.स. २०१२सालचा पुरस्कार राजीव नाईक यांना मिळाला आहे.
  • दिल्लीच्या संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार (जुलै २०१९)