Jump to content

रफायेल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रफायेल
Raphael (इटालियन)
जन्म २८ मार्च इ.स. १४८३ किंवा ६ एप्रिल १४८३
उर्बिनो, मार्के
मृत्यू ६ एप्रिल, इ.स. १५२०
रोम
पेशा चित्रकार, स्थापत्यकार
कारकिर्दीचा काळ रानिसां

रफाएल्लो सान्झियो दा उर्बिनो (इटालियन: Raffaello Sanzio da Urbino) (२८ मार्च इ.स. १४८३ किंवा ६ एप्रिल १४८३ - ६ एप्रिल, इ.स. १५२०) हा रानिसां काळातील एक इटलियन चित्रकारस्थापत्यकार होता. रफायेल, मिकेलेंजेलोलिओनार्दो दा विंची ह्या त्रिकुटाला त्या काळातील सर्वोत्तम कलाकारांचा गट मानला जातो.

केवळ ३७ वर्षे आयुष्य जगलेल्या रफायेलने आपल्या अल्प कारकिर्दीत अनेक रचनांची निर्मिती केली. या चित्रांतील रंगसंगती, जिवंतपणा व कमालीची आकर्षकता या गुणांमुळे या चित्रांची जगातील प्रमुख मोजक्या कलाकृतीत गणना केली जाते.

ह्यांपैकी अनेक चित्रे व्हॅटिकन येथील पोपच्या निवासस्थानाच्या सजावटीसाठी रफायेलने रंगवली.

द स्कूल ऑफ अथेन्स (Scuola di Atene) हे रफायेलने काढलेले सर्वोत्तम चित्र मानले जाते.

व्हॅटिकनमधील रफायेलच्या खोल्या

[संपादन]

व्हॅटिकनमधील पोपच्या राजवाड्यामध्ये ४ खोल्या (Stanze di Raffaello) रफायेलने रंगवलेल्या चित्रांनी भरल्या आहेत.

चित्रदालन

[संपादन]
साधारण दृष्य (१) साधारण दृष्य (२) पूर्वेकडील भिंत दक्षिणेकडील भिंत पश्चिमेकडील भिंत उत्तरेकडील भिंत छत चित्रांची नावे
सेग्नातुराची खोली: . Disputation of the Holy Sacrament, . Cardinal and Theological Virtues, . The School of Athens, . The Parnassus. छत.
]], . The Mass at Bolsena, . The Meeting of Leo the Great and Attila, . Deliverance of Saint Peter. छत.
बोर्गोतील विस्तवाची खोली: . Battle of Ostia, . The Fire in the Borgo, . The Coronation of Charlemagne, . The Oath of Leo III. छत.
कॉन्स्टॅन्टाईनची खोली: . The Vision of the Cross, . The Battle of the Milvian Bridge, . The Baptism of Constantine, . The Donation of Constantine. छत.

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: