मानसशास्त्र
मानसशास्त्र (इंग्लिश: Psychology, सायकॉलॉजी ;) हे मन व वर्तणूक यांचा अभ्यास करणारे विज्ञान आहे. हा इंग्रजी शब्द रुडॉल्फ गॉकेल या जर्मन तत्त्वज्ञाज्याने १६व्या शतकात तयार केला.. हा शब्द psyche साईक'(मन)' व logus लोगस(शास्त्र) या शब्दांवरून आलेल्या ग्रीक शब्दाचा अर्थ आत्म्याचे शास्त्र असा आहे. यावरून त्या काळातला या शास्त्रावरचा धार्मिक प्रभाव लक्षात येईल. परंतु काही तत्त्वज्ञांनी यास आक्षेप घेतला.'आत्मा' ही एक गूढ, अमूर्त, सिद्ध न करता येण्याजोगी संकल्पना आहे. त्यामुळे 'आत्म्याचा' शास्त्रशुद्ध अभ्यास करणे शक्य नाही. हा विचारप्रवाह विकसित होऊन मानसशास्त्राचा शास्त्र म्हणून अभ्यास व्हायला १९वे शतक उजाडावे लागले. त्यावेळी 'मनाचे शास्त्र' किंवा 'मानसिक जीवनाचे शास्त्र'(the science of mental life) अशी त्याची व्याख्या केली गेली. या काळात मानसशास्त्रज्ञ स्वयंसेवकांना त्यांच्या मानसिक अनुभवांचे (उदा.संवेदना,विचार,भावना इ.)'वर्णन करावयास सांगितले गेले, परंतु इ.स.च्या २०व्या शतकाच्या सुरुवातीला पुढे आलेल्या मतांनुसार शास्त्रात केवळ दृश्य आणि मापनीय अशाच घटकांचा अभ्यास करता येतो. मन ही अदृश्य संकल्पना आहे तिचे मापन करता येत नाही. हाच विचार पुढे वर्तनवाद (behaviourisim)या नावाने प्रसिद्ध झाला. त्यामुळे या काळात मानसिक अनुभवांऐवजी बाह्यवर्तनांचा अभ्यास करण्यावर भर दिला गेला. कारण बाह्यवर्तन दृश्य स्वरूपाचे आहे. त्यामुळे इ.स. १९२० च्या सुमारास मानवी वर्तनांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशी व्याख्या केली गेली. ही व्याख्या इ.स. १९६० च्या दशकापर्यंत स्वीकारली जात होती; मनाच्या अभ्यासात मानशास्त्रज्ञांना परत रस निर्माण झाला. '[मन]' हा शब्द मानसशास्त्राच्या पाठ्यपुस्तकांत दिसू लागला.आणि मानसशास्त्राची व्यापक व्याख्या अशी केली गेली -'वर्तनांचा आणि मानसिक प्रक्रियांचा अभ्यास करणारे शास्त्र. यात मानसिक प्रक्रियांचाही शास्त्रीय अभ्यास करता येतो असे गृहीत धरले आहे. उदाहरणार्थ, मुलाखतीसारख्या व्यक्तिमत्त्व चाचण्यांवरून माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचा वस्तुनिष्ठ अभ्यास करता येतो; मनात निर्माण झालेल्या भावनांमुळे जे शरीरांतर्गत बदल घडून येतात, त्यांचे मोजमाप करता येते. थोडक्यात अदृश्य अश्या मानसिक प्रक्रियांचा शास्त्रीय अभ्यास करता येतो, हे आता सर्वमान्य झाले आहे. वर्तन हे दृश्य व मापनीय असते. त्यामुळे वर्तनाचाही शास्त्रीय अभ्यास शक्य आहे.
मानसशास्त्र - व्याख्या :
'मानसशास्त्र' म्हटल्यानंतर मनासारख्या गूढ गोष्टींचा अभ्यास करणारे शास्त्र अशी अनेकांची समजूत असते/आहे. मानसशास्त्र शिकलेल्या व्यक्तीला काही प्रश्न नेहमी विचारले जातात. उदाहराणार्थ, तुम्हाला लोकांच्या मनातले सगळे कळते का? तुम्ही लोकांच्या मनातले कसे काढू्न घेतां? तुम्ही लोकांना मोहनिद्रेत (हिप्नोटाइज)कसे आणता? तुम्ही मनकवडे आहात का? इत्यादी.
मात्र या सर्वांपेक्षा मानसशास्त्राचा अभ्यास हा अधिक सखोल व तत्त्वज्ञानाधारित आहे, तसेच हा व्यक्तीच्या किंवा प्राण्यांच्या सर्व नैसर्गिक वा साहजिक हालचाली तसेच वर्तन यांचा सूक्ष्म निरीक्षणांतून केलेला तपशीलवार अभ्यास आहे.[१] मानसशास्त्राची अधुनिक पार्श्वभूमी- एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून मानसशास्त्र हे एक स्वतंत्र शास्त्र म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यापूर्वी तत्त्वज्ञानाचा पूरक अभ्यास विषय म्हणून मानसशास्त्राकडे पाहिले जात होते. इसवी सन पूर्व ३८४ ते ३२२ या कालावधीत मानसशास्त्राबद्दलचा अभ्यास करण्यात आला. प्लेेटो व सॉक्रेटिस या दोन तत्त्वचिंतकांनी मानवाच्या आत्म्याचा मनाचा व स्वभावाचा अभ्यास केला. त्यांच्यामध्ये शरीराचे कार्य मनाकडून केले जाते. यामधूनच व्यक्तीला ब्रह्मज्ञान व वेदान्ताच्या प्रवाहाने वेगळ्या प्रवृत्तीकडे नेले. याच काळात सर्वात शक्तिमान परमेश्वर म्हणून त्याच्याकडे पाहिले जात होते. तेव्हापासून मानवांचा संबंध परमेश्वराशी लावला जाऊ लागला. त्यातूनच आत्मा पाप या शब्दांना महत्त्व प्राप्त झाले. म्हणून एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला कायद्याने नेमून दिलेल्या पुजाऱ्यांनी मानसशास्त्र शिकवण्यास सुरुवात केली. आज हेच मानसशास्त्र एकोणिसाव्या शतकाच्या किंवा एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून एक प्रगत आधुनिक मानसशास्त्र म्हणून पुढे आले. त्याची व्याप्ती प्रचंड वेगाने होत आहे. तेव्हापासून मानसशास्त्राकडे पाहण्याचा कल बदलत आहे. आजचे मानसशास्त्र इतर शास्त्रांसारखेच विज्ञान म्हणून गणले जाऊ लागले.
मानसशास्त्र म्हणजे मानवी मनाचा अभ्यास करणारे शास्त्र
मन आणि शरीर एकमेकांवर अवलंबून असते शरीराच्या हालचालींवर मनाचे नियंत्रण असते तर ज्ञानेंद्रियांच्या सहाय्याने बाह्य परिस्थिती मध्ये काय घडत आहे याची माहिती मनाला होत असते शरीर व मनाची ही आंतरक्रिया मेंदूमध्ये असणाऱ्या पीनियल ग्रंथि द्वारे होत असावी असे देकार्त व मे गुगल यांनी मत मांडले देकार्त यांच्या विचार प्रवाहातून आत्म्याच्या मानसशास्त्रात मनाच्या मानसशास्त्राची जागा घेतली परंतु याही व्याख्येवर टीका करण्यात आली की मन ही कल्पना सर्वांना परिचित असले तरी सर्वसामान्य लोकांना मानवी मन हे न उलगडणारे कोडेच आहे मानवी मन व्यक्तीला दिसत नसले तरी त्याचे अस्तित्त्व गृहीत धरले जाते परंतु कोणत्याही शास्त्रामध्ये वास्तविक कल्पनांना महत्त्व दिले जाते जे दिसत नाही त्याचा अभ्यास करता येत नाही त्याचबरोबर मानवी मन हे अतिशय चंचल व हळवी असल्याने त्याचा अभ्यास करता येत नाही अशा प्रकारच्या ठिकाणांमुळे काल दोघांमध्येही व्याख्या मागे पडली 2. बोधात्मक अनुभवांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय एकोणिसाव्या शतकात मानसशास्त्राच्या इतिहासाला एक वेगळेच वळण लागले प्रायोगिक पद्धतीचे महत्त्व मानसशास्त्राला पटले गेले येथून आधुनिक मानसशास्त्राचे वाटचाल सुरू झाली विल्यम उंट या मानसशास्त्रज्ञाने 1879 मध्ये जर्मनीमधील लिंबजी या विद्यापीठांमध्ये पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा सुरू केली त्याच कालावधीत ही व्याख्या तयार केले व्यक्तीला स्वतःविषयी आलेला राग लोभ यांसारख्या जाणिवांचा भावभावनांचा अभ्यास केला जात होता कधी व्यक्तीच्या जाणिवेचे विश्लेषण करून मानवी जाणिवा निर्माण कसा होतात हे पाणी मानसशास्त्राचे प्रमुख काम आहे असे म्हणले आहे यासाठी त्यांनी आत्मनिरीक्षण पद्धतीचा वापर केल अर्थात बोधात्मक अभ्यासासाठी वापरली जाणारी आत्मनिरीक्षण पद्धती ही फक्त प्रौढ व्यक्ती व सुसंस्कृत व्यक्ती साठी वापरणे शक्य होते त्यामुळे बोधात्मक अनुभव प्रत्येक व्यक्ती पुरता मर्यादित असतो अशा व्यक्तिगत अनुभव आला शास्त्राच्या वर्गात आणि त्याचा पडताळा करणे योग्य नाही एका व्यक्तीला आलेला अनुभव इतर व्यक्तींना येईलच असे खात्रीशीर सांगता येत नाही म्हणून ही व्याख्या नाहीशी झाली 3. बोधात्मक व बोधात्मक अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय मानवी जीवनात जाणिवेचे क्षेत्र मर्यादित असल्याने बोधावस्था बरोबर व्यवस्थेचा अभ्यास केला जावा यासाठी डॉक्टर सिग्मंड फ्रॉइड यांनी 1900 मध्ये ही व्याख्या केली व्यक्ती वर्तनाची मूळे व्यक्तीच्या आधी सुप्त मनात रुजलेली असतात त्यावर व्यक्तीचे वर्तन अवलंबलेले असते परंतु विसाव्या शतकाच्या पहिल्या काही दशकांमध्ये इतर काही मानसशास्त्रज्ञांनी मानवाच्या वर्तनावर अधिक लक्ष केंद्रित केले त्यामुळे फ्रॉइडची ही व्याख्या काल योगामध्ये मागे पडली 4. मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय
इतिहास
[संपादन]१९व्या शतकाच्या उत्तरार्धात मानसशास्त्र हे एक स्वतंत्र शास्त्र म्हणून ओळखले जाऊ लागले. त्याआधी प्लेटो, ॲरिस्टाॅटल या ग्रीक तत्त्वज्ञांनी मानवाच्या मनाचा व आत्त्म्याचा आभ्यास केला आहे. ॲरिस्टाॅटलने (इ.स.पूर्व.३८४-३२२) मन हे शरीराचे कार्य आहे असे प्रतिपादन केले आहे. पुरातन काळात Psychology म्हणजे 'आत्म्याचा अभ्यास करणारे शास्त्र' ही व्याख्या उदयास आली होती. Psyche (साइक) म्हणजे आत्मा व logus (लोगस) म्हणजे विज्ञान असा अर्थ याची फोङ केल्यावर होतो. ही कल्पना अनेक शतके होती.'De Anima' या ग्रंथात मानसशास्त्र विषयक अभ्यास केला आहे. त्यानेही आत्मास Psyche ही संज्ञा वापरली होती. हिप्पोक्रेटिसचा मेंदूचा अभ्यास, हेरोफिलसचा शवविच्छेदन करून केलेला अभ्यास हा एक प्रकारे मानसशात्रीय अभ्यास, शारीरिक हालचाली इत्यादी माहिती देणारे होते. गॅलनने तर शरीरशास्त्राच्या अभ्यासाबरोबर मानसशास्त्राचा अभ्यासही करण्याचे प्रयत्न केले. उदा० व्यक्तिमत्त्वातील घातक भावनानुभव, इत्यादी. १६व्या शतकात मानसशास्त्रावर अनेक ग्रंथ लिहिले गेले. इ.स १४५० ते १५५० हा कालखंड युरोपचा प्रबोधन काळ मानला जातो.१७व्या शतकात देकार्तने केलेले कार्य विचारात घेण्यासारखे आहे.'आय थिंक; देअरफोर आय एम' हे त्याचे विधान जगविख्यात आहे. याने प्रतिक्षिप्त क्रिया, भावना, इत्यादींबाबत अभ्यास केला. यानंतर लॉक, बेन, हर्बर्ट इत्यादी ब्रिटिश-जर्मन तज्ज्ञांनी मन व शरीर यांचे स्वतंत्र अस्तित्त्व, परस्परावलंबित्व स्पष्ट करण्याचा प्रारंभ केला. मानवी मनाचा व वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय, अशी नवीन व्याख्या तयार केली आहे. सिग्मंड फ्राईड हा मनोविश्लेषणवादाचा जनक आहे.
मानसशास्त्रात वर्तनाला अत्यंत महत्त्वाचे स्थान दिसून येते. एकूण मानसशास्त्रीय संशोधन हे वर्तनाभोवती दिसून येते. वर्तन म्हणजे उद्दिपकाला अनुसरून व्यक्ती अथवा प्राण्याने केलेली कोणतीही प्रतिक्रिया होय.-
वर्तनामध्ये पुढील तीन पैलू दिसून येतात
१ . बोधात्मक -या वर्तनामध्ये व्यक्तीच्या वेदन, संवेदन, स्मरण,विचार,अध्ययन, भाव,भावना, इ.चा समावेश होतो.
२ . भावात्मक - या वर्तनामध्ये सुख,दुःख,राग,आनंद ,भीती, इ .बाह्य भावभावनांचा समावेश होतो.
३ . क्रियात्मक - या वर्तनामध्ये चालणे, बोलणे,लिहिणे, पोहणे, हसणे, इ.अनेक शारीरिक हालचालींच्या दृश्य स्वरूप वर्तनाचा समावेश होतो.
व्याख्या
मॉर्गन किंग - मानव व मानवेतर प्राण्याच्या अनुभवनिष्ठ वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय.
आधुनिक व्याख्या -वर्तन आणि मानसिक प्रक्रियांचा शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय.
मानसशास्त्राच्या अभ्यासाची उद्दिष्टे
वर्तन आणि विचार प्रक्रिया यांच्याबद्दल माहिती मिळवणे/ वर्तनाचे वर्णन करणे:-
[संपादन]कोणतेही वर्तन जाणून घेण्यातील पहिली पायरी म्हणजे त्या वर्तनाला नाव देणे. वर्तनाचे निरीक्षण करणे, त्या संबंधीच्या सर्व नोंदी करणे यांचा अंतर्भाव वर्णनात होतो. काय वर्तन घडत आहे? कुठे घडत आहे? कोणा बाबतीत घडत आहे?आणि कोणत्या परिस्थितीत घडत आहे, इत्यादींचे निरीक्षण, त्यासंबंधीच्या सविस्तर नोंदी म्हणजे वर्तनाचे वर्णन होईल. उदाहरणार्थ-दुसऱ्या इयत्तेतील विद्यार्थिनींच्या वर्तनातील काहीतरी विचित्रपणा शिक्षकांच्या निदर्शनास येतो. ही विद्यार्थिनी वेळेच्या वेळी गृहपाठ करत नाही. परीक्षेतील गुणांमध्ये घसरण होत आहे. शाळेविषयी तिचा दृष्टिकोनही नकारात्मक आहे.हे 'सर्व काय घडत आहे' याचे वर्णन होय. वर्तनाच्या अभ्यासातील हे पहिले ध्ये पूर्ण केल्यानंतर त्यानंतरचे ध्येय म्हणजे ती विद्यार्थिनी असे का वागत आहे. याचा शोध घेणे.
वर्तन समजून घेणे/ स्पष्टीकरण:-
[संपादन]ती विद्यार्थिनी हे सर्व का करत आहे,याचा शोध लावण्यासाठी शिक्षक शालेय समुपदेशकाला त्या विद्यार्थिनीला सुयोग्य मानसशास्त्रीय चाचण्या देण्यास सांगतील.तिच्या पालकांनी तिला बालरोगतज्ञांकडे नेऊन तिला कसली ॲलर्जी अथवा शारीरिक आजार नाहीना याची खातरजमा करून घ्यावी.असेही शिक्षक सुचवतील.कदाचित तिचे पालक तिला काही मानसशास्त्रीय तपासणी करण्यासाठी मानसशास्त्रज्ञांकडेही नेतील. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे झाल्यास या विद्यार्थिनीच्या वर्तनाचे स्पष्टीकरण करण्यासाठी शिक्षक सर्वतोपरी प्रयत्न करतील.कोणत्याही वर्तनासंबंधीचा सिद्धांत प्रस्थापित करण्यात येईल. हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. निरीक्षीतवर्तन अथवा बाबींचे सर्वसामान्य स्पष्टीकरण करणे म्हणजे सिद्धान्त होईल.वर्तनाचे वर्णन करणे. या ध्येयपूर्तीच्या प्रयत्नातून वर्तनाचे निरीक्षण घडते. तर वर्तनाचे स्पष्टीकरण करण्याच्या यशस्वी प्रयत्नामुळे सिद्धान्त निर्मिती होते. वरील सर्व मार्गांचा अवलंब केल्यानंतर शिक्षकांना असे आढळले की, या विद्यार्थिनीला अध्ययन समस्या (उदाहरणार्थ वाचन अक्षमता) आहे. ज्यामुळे ती तिच्या वयाच्या इतर सर्वसामान्य बुद्धिमत्तेच्या विद्यार्थ्यांप्रमाणे वाचन करू शकत नाही. यानंतरचा टप्पा येतो तो पूर्व कथनाचा हे असेच चालू राहिले तर काय घडू शकते, याचे पूर्वकथन करण्याचा प्रयत्न केला जाईल.
वर्तनासंबंधी भविष्यकथन करणे :-
[संपादन]भविष्यात काय घडेल.हे ठरविणे म्हणजे पूर्वकथन होय. उपरोक्त उदाहरणात बाबत बोलायचे झाल्यास मानसशास्त्रज्ञ अथवा समुपदेशक तत्सम परिस्थितीतील पूर्व संशोधनाचा आधार घेतील, आणि असे पूर्वकथन करतील की, विद्यार्थिनींचे शालेय वर्तन कायम निकृष्ट दर्जाचे राहील. ती तिच्या वयाला अनुरूप अध्ययन क्षमतेचे प्रकटीकरण कधीच करू शकणार नाही.
वर्तनाला नियंत्रित करणे किंवा वर्तनात बदल घडविणे:-
[संपादन]नियंत्रणात वा विशिष्ट वर्तनातील सुधारणात्मक बदल हा एकेकाळी वादाचा विषय होता.काही लोकांच्या मते नियंत्रण म्हणजे ब्रेनवॉशिंग परंत मानसशास्त्राच्या या ध्येयात हा अर्थ अभिप्रेत नाही. एखादे अनिश्चित वर्तन (उदाहरणार्थ परीक्षेत नापास होणे) हे इच्छित वर्तनात बदल म्हणजे नियंत्रण, आणि हे मानसशास्त्राचे एक ध्येय आहे. वरील उदाहरणातील वाचनक्षमता असलेल्या विद्यार्थिनीच्या बाबतीत काही अध्ययन तंत्र वापरून वाचन कौशल्य सुधारणा घडविता येईल. मानसशास्त्रज्ञ आणि शिक्षणतज्ञ यांच्या संयुक्त प्रयत्नांतून या विद्यार्थिनींसाठी सुयोग्य प्रशिक्षण तंत्र योजता येईल.
अर्थात येथे एक गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे,.ती अशी की सर्व मानसशास्त्रीय संशोधन ही चारही ध्येय गाठण्याचा प्रयत्न करतील असे नाही. काही संशोधनांमध्ये वर्णन व पूर्वकथन यांवर अधिक भर असेल. काही विशिष्ट परिस्थितीत लोक काय करतील.यासंबंधी अनुमान मानतील तर काही मानसशास्त्रज्ञ हे वर्तनाचे वर्णन आणि स्पष्टीकरण करण्यात रुची ठेवतील. उदा० प्रायोगिक मानसशास्त्रज्ञांनी निरीक्षित वर्तनाचे म्हणजेच वर्णिलेल्या वर्तनाचे स्पष्टीकरण शोधण्यासाठी संशोधन करतील. मानसउपचार तंत्रज्ञ मात्र वर्तन नियंत्रणावर अधिक लक्ष केंद्रित करतील. असे करताना इतर तीन गोष्टींना साहाय्यभूत ठरतील.
मानसशास्त्राची आधुनिक पार्श्वभूमी :-
[संपादन]एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून मानसशास्त्र हे एक स्वतंत्र शास्त्र म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यापूर्वी मानसशास्त्र एक तत्त्वज्ञानाचा पूरक अभ्यास विषय म्हणून माणसाकडे पाहिले जात होते. इ. स. सन पूर्व ३८४ ते ३२२ या काळात मानसशास्त्राबद्दलचा अभ्यास करण्यात आला. प्लेटो व सॉक्रेटिस या दोन तत्त्वचिंतक यांनी मानवाच्या आत्म्याचा मनाचा व स्वभावाचा अभ्यास केला. त्यांच्यामते शरीराचे कार्य मनाकडून केले जाते. यामधूनच ब्रह्मज्ञान व वेदांताच्या प्रवाहाने वेगळ्याच प्रवृत्तीकडे व्यक्तीला नेले. यात काळात सर्वात शक्तिमान परमेश्वर म्हणून त्याच्याकडे पाहिले जात होते. तेव्हा पासून मानवांचा संबंध परमेश्वराशी लावला जाऊ लागला. त्यातूनच आत्मा पाप या शब्दांना महत्त्व प्राप्त झाले. म्हणून एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस कायद्याने नेमून दिलेल्या पुजाऱ्यांनी मानसशास्त्र शिकवण्यास सुरुवात केली. आज हेच मानसशास्त्र एकोणिसाव्या शतकाच्या किंवा एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून एक प्रगत आधुनिक मानसशास्त्र म्हणून पुढे येत आहे. त्याची व्याप्ती प्रचंड वेगाने होत आहे तेव्हापासून मानसशास्त्र कडे पाहण्याचा कल बदलत आहे आजचे मानसशास्त्र तर्कशास्त्र यांसारखे शास्त्र म्हणून गणले जाऊ लागले.
मानसशास्त्राच्या व्याख्या/ इतिहास :- सॉक्रेटिस प्लेटो ॲरिस्टॉटल या तत्त्वचिंतकांनी मानवी मन, आत्मा, जाणीव, स्वभाव यांविषयी अभ्यास केला. व्यक्तीला स्वतःविषयी वाटणारी जिज्ञासा व्यक्तिवर्तनाबद्दल वाटणारे कुतूहल यांतूनच मानसशास्त्राचा जन्म झाला. कोणत्याही शास्त्राची व्याख्या परिवर्तनशील असते. शास्त्राच्या अभ्यास विषयात वाढ झाल्यानंतर व्याख्यासुद्धा नव्याने करावी लागते. मानसशास्त्राच्या शाखांमध्ये वाढ झाल्याने पूर्वीच्या व्याख्या व आजच्या व्याख्यांमध्ये फरक दिसून येतो. त्यातील मानसशास्त्राच्या सुरुवातीच्या व्याख्या खालील प्रमाणे.
- . मानसशास्त्र म्हणजे आत्म्याचा अभ्यास करणारे शास्त्र होय
- . मानसशास्त्र म्हणजे मानवी मनाचा अभ्यास करणारे शास्त्र होय.
- . बोधात्मक अनुभवांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय.
- . बोधात्मक व अबोधात्मक शास्त्राचा अभ्यासन करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय.
- . मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय.
वर्तन म्हणजे काय?: व्यक्ती ज्या वातावरणात वावरत असते ते वातावरण वस्तू, व्यक्ती, संस्था रूढी-परंपरा, प्रकाश, उष्णता इ घटनांनी बनलेले असते. या घटकांचा व्यक्तीवर सतत परिणाम होत असतो. त्या घटकांशी व व्यक्तींशी परस्पर देवाण-घेवाण चालू असते. म्हणूनच वातावरणातील घटकांना अनुसरून व्यक्तीकडून मिळणारी प्रतिक्रिया म्हणजे वर्तन होय.
" विशिष्ट उद्दीपकाला अनुसरून व्यक्तीकडून दिली जाणारी प्रतिक्रिया म्हणजे वर्तन होय"
वर्तनाचे सूत्र:-
उद्दीपक - व्यक्ती जीव - प्रतिक्रिया
थोडक्यात मानवी वर्तन ही बोधात्मक भावात्मक क्रियात्मक अशा घटकांनी बनलेले असते.
मानसशास्त्राची व्याख्या (Definition of psychology):-
- . मानसशास्त्र हे वर्तनाचे आणि बोधनिक प्रक्रियांचे शास्त्र आहे.-रॉबर्ट अे.बँरन (२०२१)
- . मानसशास्त्र म्हणजे वर्तन व त्यामागील मानसिक प्रक्रियांचा शास्त्रीय अभ्यास होय.-स्मित फिल्डमन(२००२)
मानसशास्त्राचा उगम व विकास:-
[संपादन]मानसशास्त्र हे वर्तनाच्या अनेक पैलूंचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. त्यामुळे मानसशास्त्राची अचूक व मूर्त व्याख्या करणे कठीण आहे. पूर्वी मानसशास्त्र हे तत्त्वज्ञानाची शाखा होते. एकोणिसाव्या शतकात मानसशास्त्र शास्त्र म्हणून उदयास येण्यास सुरुवात झाली. प्लेटोच्या मते ज्ञान हे अंतर्भूत असते. तर जॉन लॉकच्या मते प्रत्येक मूल हे कोरी पाटी घेऊन जन्माला येते, आणि ज्ञान हे अध्ययन व अनुभवातून मिळवले जाते.
आत्म्याचे शास्त्र- पूर्वीच्या संशोधनाच्या आधाराने मानसशास्त्राची व्याख्या बनविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
psyche- म्हणजे आत्मा आणिlogos म्हणजे शास्त्र त्यामुळे मानसशास्त्राचा अर्थ आत्म्याचा अभ्यास करणारे शास्त्र असा झाला पण या वाक्यामुळे मानसशास्त्रज्ञ समाधानी नव्हते, कारण आत्मा पाहता येत नाही आणि ती मूर्त संकल्पना नाही आत्म व मन ह्या दोन्ही अमूर्त संकल्पना आहेत तर्कशास्त्राची माहिती निरीक्षणांच्या आणि प्रयोगांच्या आधारे सिद्ध होते. आणि जर मानसशास्त्र हे शास्त्र असेल तर त्या माहितीला निरीक्षण आणि प्रयोगाचा आधार असला पाहिजे. पण मन व आत्म्याचे निरीक्षण होऊ शकत नाही; आपण मनाला व आत्म्याला बघू शकत नाही, किंवा स्पर्श करू शकत नाही. आपण त्यांचे स्वरूप सांगू शकत नाही किंवा ते कुठे आहेत हे दाखवू शकत नाही, म्हणून मानसशास्त्राची व्याख्या बदलण्यात आली.
बोधावस्थेचा अभ्यास एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात जर्मन शास्त्रज्ञ विल्यम उंट यांनी मानवी वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा जर्मनीच्या लिपझिक येथेसन १८७९मध्ये सुरू केली. त्यांनी बोधात्मक अनुभव ही संज्ञा बनवली. बोधात्मक अनुभव म्हणजे व्यक्तीला मानसिक घडामोडीची असलेली जाणीव. ही जाणीव व्यक्तीच्या स्मरणात असलेल्या मानसिक प्रतिमा व त्यांच्या भूत, वर्तमान व भविष्य काळात असलेल्या जाणिवेशी निगडित असते. त्यांनी प्रतिक्रिया देण्यासाठी लागणारा वेळ व संवेदन बोधावस्था यांवर आधारित प्रयोग केले. त्यानंतर मानसशास्त्राचा शास्त्र म्हणून उदय झाला.
अबोध वर्तनाचा अभ्यास
डॉक्टर सिग्मंड फ्राईड यांनी मानसशास्त्राचा गोदा (??) व सत्तेच्या दृष्टिकोनातून विचार केला त्यांच्यामते आपल्या वर्तनामागच्या प्रेरणांची आपल्याला जाणीव नसते. माणसाच्या मनाची एक अबोध पातळी अशी असते की जिथे त्याच्या धोकादायक ठरू शकणाऱ्या तीव्र इच्छा व आकांक्षा दबल्या जातात. त्यांनी लहान वयात येणाऱ्या अनुभवांवर भर दिला, आणि ठरवले की व्यक्तिमत्त्वाची जडणघडण ही वयाच्या पहिल्या पाच वर्षात होत असते. डॉक्टर सिग्मंड फ्राईडम अँड्रॉइड हे ऑस्ट्रियन मानसशास्त्रज्ञ मनोविश्लेषणाचे संस्थापक समजले जातात.
मानसशास्त्राची अबोधावस्थेच्या दृष्टीने व्याख्या :
बाल्यावस्थेतील अनुभव आणि अबोध प्रेरणा यांचा व्यक्तीच्या वर्तनावर आणि व्यक्तिमत्त्वावर प्रभाव असतो जर व्यक्तीच्या आयुष्यात काही महत्त्वाच्या मानसिक समस्या दिसून आल्या तर त्यांचे मूळ कारण त्यांना लहानपणी असलेल्या अनुभवांत असते
मानसशास्त्रातील विविध क्षेत्रे :
सकारात्मक मानसशास्त्र- सन १९०२मध्ये विल्यम जेम्सने "धार्मिक अनुभवांचे विविध प्रकार" हे पुस्तक लिहिले. येथूनच सकारात्मक मानसशास्त्राचा इतिहास सुरू होतो. यात मानवी जीवनातील सुख व ते प्राप्त करण्यासाठी आरोग्यदायी मनाची गरज कशी असते, याचा उल्लेख केला आहे. यानंतर पुढे सन १९६०मध्ये "तिसरी शक्ती" हा चिकित्सात्मक व वर्तनात्मक दृष्टिकोनाऐवजीचा मार्ग अब्राहम मॅस्लो, कार्ल रॉजर्स इत्यादी मानवतावादी मानसशास्त्रज्ञांनी, एक नवा दृष्टिकोन दाखवून दिला. ह्या सभ्य दूरदृष्टीचा परिणाम संस्कृतीवर मोठ्या प्रमाणात झाला. त्यांनी भरपूर प्रमाणात वचने पाळण्याचा संकल्प केला. दुर्देवाने मानवतावादी मानसशास्त्रामध्ये भरपूर प्रमाणात संशोधनावर आधारित अशी प्रगती झाली नाही. यात काहींनी स्वमदत चळवळ सुरू केली. सुरुवातीच्या काळात यातील स्व म्हणजे काय? आत्मकेंद्रित का म्हणजे काय? इत्यादी प्रश्नावर जोर दिला. यामुळे सामूहिक खुशालीचा अर्थ लागण्यास मदत झाली. अगदी सुरुवातीलाम अमेरिकन मानसशास्त्रज्ञ व थोर तत्त्वज्ञ विल्यम जेम्स यांनी मानवी जीवनात सुख ही प्रमुख संबंधित बाब आहे असे मत मांडले. पारंपरिक मानसशास्त्रात चिंता, खिन्नता आणि इत्यादी नकारात्मक घटनांवर भर दिलेला आहे. अशा सर्व नकारात्मक घटकांना एकत्रित करून चिकित्सा मानसशास्त्रज्ञांनी DSM-IV-TR अशी संकल्पना उपयोगात आणली.. या संकल्पनेनुसार मानसिक आजारांचाया (mental illness चा) वर्गवारीनुसार पद्धतशीर अभ्यास केला जातो. मानसशास्त्राच्या आधुनिक इतिहासामध्ये खुशालीऐवजी मानसिक आजाराचा अभ्यास केला जातो. सुख हे सामर्थ्य, निरपेक्ष प्रेम व व कृतिप्रवण त्यातून व्यक्त होत असते. विना मोबदल्यात जितके सुख सामावले आहे. तितके परतावा वा पैसे घेऊन सेवा करण्यात नाही. संतांनी निरपेक्ष सेवा केली आहे. अशा प्रकारची सेवा करणाऱ्या किंवा वागणाऱ्या माणसांना निरोगी मनाची माणसे असे म्हणतात.
मानसशास्त्रात उदयाला आलेली सकारात्मक मानसशास्त्र ही एक नवीन शाखा आहे. मार्टिन सेलिगमन यांनी २००२मध्ये सकारात्मक मानसशास्त्राची संकल्पना पहिल्यांदा मांडली. या आधुनिक मानसशास्त्रज्ञाने सकारात्मक मानसशास्त्राला एक नवे दृश्य प्राप्त करून दिले. अमेरिकन सेलिगमनने त्यांच्या १९९८मधील अध्यक्षीय भाषणात मानसशास्त्रीय संघटनेला(APA) मानसशास्त्राच्या क्षेत्रात एक नवीन दिशा देण्याची विनवणी केली. मानवी वर्तनातील वाइटातल्या वाइटाचा अभ्यास करण्यापासून ते चांगल्यातल्या चांगल्या वर्तनाची उन्नति करण्याचा अभ्यास झाला पाहिजे, असा आग्रह सेलिग्मनने त्या ठिकाणी धरला. त्यांनी त्या सभेत प्रेक्षकांना विचारले की मानसशास्त्र आनंदाने धैर्य यांसारख्या गोष्टींचा अभ्यास का करत नाही? मानसशास्त्रामध्ये असंतुलन आढळून आलेले आहे. म्हणून संतुलन साधण्यासाठी सकारात्मक मानसशास्त्राची गरज आहे. आपण आपले संपूर्ण लक्ष दुर्बलपणा, विपत्ती हालाहाल निर्देशांक कमी करण्याकडेच वेधतो. सामर्थ्य आणि आरोग्याची उन्नती करण्याकडे आपण फार कमी लक्ष देतो. विकृती प्रारूपाच्या पलीकडे जाऊन सकारात्मक मानसशास्त्रज्ञांनी त्याची व्याप्ती वाढवावी, त्याच्या अभ्यासाची उन्नती करावी. आजच्या जगात अनेक व्यक्ती या नैसर्गिक आपत्ती,अतिरेकी हल्ले, आर्थिक मंदी, प्रिय व्यक्तीचा मृत्यू, अपयश,अतिरेकी स्पर्धा इत्यादी स्वरूपाच्या विविध सामाजिक आणि वैयक्तिक आव्हानांना सामोरे जात आहेत. या सगळ्या नकारात्मक परिस्थितीमध्ये असे काही आहे का की जे आनंद सकारात्मकता यांच्यामध्ये वाढ करेल? आणि त्यांचे मापनही करता येऊ शकेल? आनंदी आणि सातत्य जीवन जगण्यासाठी सकारात्मक रहायला शिकणे अत्यंत महत्त्वाचे आहे.सकारात्मक मानसशास्त्र या नवीन शाखेचा समावेश मानसशास्त्रामध्ये केला. आनंद, सकारात्मकता, आशावादी वृत्ती कशी वृद्धिंगत करायची याचे मापन कसे करायचे याचा समावेत सकारात्मक मानसशास्त्रामध्ये केला जातो. समाजामध्ये काही लोक असे असतात. की कोणत्याही प्रकारचा फायदा मिळणार नाही. हे माहीत असून सुद्धा सातत्याने कार्यरत असतात. उदाहरणार्थ समाजसेवा करणारे स्वतःच्या जिवाची पर्वा न करता इतरांचे प्राण वाचवणारे वर्तन करतात. अनेक मानसशास्त्रज्ञांनाही हा प्रश्न पडला की ते असे वर्तन का करतात. त्यापैकी काहींना असे वाटले की त्यांच्या जन्मजात गुणधर्मामुळे त्यांच्याकडून अशा प्रकारच्या चांगल्या सदाचार घडवून आणणारे वर्तन होत असावे. याउलट समाजात अशा काही व्यक्ती असतात जाणीवपूर्वक चुकीच्या वर्तनात गुंतलेल्या असतात. सर्वसाधारणपणे या प्रकारच्या सकारात्मक गुणधर्मापेक्षा माणूस नकारात्मक घटनांकडे अधिक लक्ष देतो. म्हणूनच पारंपरिक मानसशास्त्रज्ञ नेहमीच सकारात्मक वर्तन प्रकारांपेक्षा नको असलेल्या नकारात्मक वर्तन प्रकारांकडे लक्ष केंद्रित करत असतात. त्यामुळे सकारात्मक मानसशास्त्र सद्गुण,क्षमता आनंद आणि अर्थपूर्ण जीवन यांसारख्या या घटकांचा विचार करते.
चिकित्सा मानसशास्त्र
औधोगिक मानसशास्त्र
समुपदेशन मानसशास्त्र
सामाजिक मानसशास्त्र
वैकासिक मानसशास्त्र
आरोग्याचे मानसशास्त्र
गुन्हेगारी मानसशास्त्र
क्रीडा मानसशास्त्र
सकारात्मक मानसशास्त्र
रंगांचे मानसशास्त्र
राजकीय मानसशास्त्र
जाहिरातीचे मानसशास्त्र
अभियांत्रिकी मानसशास्त्र
बाल मानसशास्त्र
उपभोक्ता/ ग्राहक मानसशास्त्र
स्त्री मानसशास्त्र
मानसशास्त्राच्या अभ्यास पद्धती
[संपादन]निरीक्षण पद्धत
[संपादन]१.नैसर्गिक निरीक्षण :- काहीवेळा संशोधकांना प्राण्यांच्या किंवा माणसांच्या एका समूहात बाबत काय घडत आहे हे जाणून घ्यावयाचे असते. अशा वेळेस प्राणी अथवा माणसे त्यांच्या सर्वसामान्य नेहमीच्या परिस्थितीत कसे वर्तन करतात, याचे निरीक्षण करणे सर्वोत्तम ठरते.आणि म्हणूनच प्राणी संशोधिका जेन गुडाल चिंपाझीच्या वस्तीत गेल्या. आणि ते त्यांच्या नैसर्गिक परिस्थितीत कसे खातात, खेळतात, झोपतात इत्यादींचे त्यांनी निरीक्षण केले. लोकांच्या बाबतीत संशोधक कामाच्याजागी, घरी, रीडा मैदानावर नैसर्गिक निरीक्षण पद्धतीतल्या वर्तनाचा अभ्यास करतात. (उदाहरणार्थ किशोरावस्थेतील मुले-मुली विरुद्धलिंगी व्यक्तीसोबत सामाजिक परिस्थितीत कसे वर्तन करतात) हे जर अभ्यासवायाचे असेल. तर शनिवारच्या संध्याकाळी अथवा रात्री एखाद्या भव्य मॉलला भेट द्यावी. तेथे वर्तनाचे अनेक नमुने सहजपणे पाहावयास मिळतात. नैसर्गिक निरीक्षणाचे अनेक फायदे आहेत. सर्वात महत्त्वाचा फायदा असा की, प्रत्यक्षच वर्तनाचे निरीक्षण केल्यामुळे वर्तन नेमके कसे घडते, याचे वास्तव पूर्ण दर्शन घडते. प्रयोगशाळेसारखे कृत्रिम परिस्थितीत घडणारे वर्तन कृत्रिम असते. त्यात वास्तवतेचा अंश असतोच असे नाही. अर्थात नैसर्गिक निरीक्षण पद्धती वापरताना काही दक्षता घेणे आवश्यक असते. बऱ्याचदा असे होते की, जेव्हा व्यक्तीच्या लक्षात येते की तिच्या वर्तनाचे कोणतेही निरीक्षण करत आहे, तेव्हा त्याचे वर्तन स्वाभाविकपणे घडत नाही. त्यात कृत्रिमता येते. याला निरीक्षकांचा परिणाम असे म्हणतात. खरे म्हणजे निरीक्षक हा व्यक्क्तीच्या नजरेस पडता कामा नये. तो दृष्टीआड हवा. मानवावर संशोधन करताना मात्र हे शक्य होत नाही. वरील शॉपिंगवरच्या उदाहरणात संशोधक काळा चष्मा लावून पुस्तक वाचत असल्याचा देखावा निर्माण करून युवक-युवतींच्या वर्तनाचे निरीक्षण करू शकतो. काही परिस्थितीत एक मार्गी आरशाचाही उपयोग करता येतो. या आरशामुळे निरीक्षकाला समोरील व्यक्तीच्या वर्तनाचे प्रत्यक्ष निरीक्षण करता येते. परंतु व्यक्तीला मात्र निरीक्षक दिसत नाही. बऱ्याचदा सहभागयुक्त निरीक्षण पद्धतीत एक मार्ग म्हणून आरशाचा वापर केला जातो. सहभागयुक्त निरीक्षण हा नेसर्गिक निरीक्षणाचा एक प्रकार असून निरीक्षक हा या समूहाचे निरीक्षण करावयाचे आहे, त्या समूहाचा तो एक सदस्य असल्यासारखा वावरतो व समूह सदस्यांच्या वर्तनाचे निरीक्षण करतो.
नैसर्गिक निरीक्षणाचे काही तोटेही आहेत. एक तोटा म्हणजे निरीक्षकाचा पूर्वग्रह. आपल्याला काय पाहायला मिळणार आहे, यासंबंधीच्या निरीक्षकाच्या मतांचा व अपेक्षांचा त्याच्या निरीक्षणावरील होणारा परिणाम म्हणजे निरीक्षक-पूर्वग्रह- परिणाम .यामुळे होते काय तर जे निरीक्षकाच्या अपेक्षांना पुष्टी देणारे असते, तेवढेच पाहण्याकडे त्याचा कल होतो. जे त्याच्या अपेक्षांच्या चौकटीत बसत नाही, त्याकडे त्याचे दुर्लक्ष होते. या समस्येवर तोडगा म्हणजे अंध निरीक्षण होय. यात निरीक्षकाला नेमका संशोधनाचा प्रश्न काय आहे हेच ज्ञात नसते, त्यामुळे निरीक्षणावर पूर्वग्रहाचा परिणाम संभवत नाही.
२ नियोजनपूर्ण निरीक्षण
[संपादन]प्रायोगिक पद्धती
सर्वेक्षण पद्धती
मानसशास्त्रातील करीअरच्या संधी
महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून
विविध संशोधन प्रकल्पात सहभागी
समुपदेशन केंद्रात तज्ज्ञ म्हणून
मनोरुग्णालयात मानसतज्ज्ञ म्हणून
शाळा महाविद्यालयात समुपदेशक म्हणून
क्रीडा समुपदेशक म्हणून
मानसशास्त्रावरील मराठी पुस्तके
[संपादन]- अटळ दुःखातून सावरताना (संज्योत देशपांडे)
- अध्ययन आणि अध्यापन (गोकुल डामरे, डॉ. हर्षानंद खोब्रागडे)
- आजारपणाचे मानसशास्त्र (द.पां. खांबेटे
- आता उजाडेल...: मानसिक व्याधींचा वेध (नीलिमा बापट)
- आपल्या मुलांच्या समस्या आणि उपाय (नसरीन पटेल)
- आरसा: स्वतःला ओळखण्याचा मानसशास्त्रीय प्रश्नसंच (आशा परुळेकर)
- उपयोजित मानसशास्त्र (संपादक - :नवरे, म.न.पलसाने)
- उपयोजित मानसशास्त्र (डॉ. निशा मुंदडा)
- कोणत्याही परिस्थितीत ठाम कसे रहावे? (मूळ इंग्रजी लेखक - गिल हॅसन, सू हॅडफिल्ड; मराठी अनुवादक - विजया देशपांडे)
- कृतार्थ वार्ध्यक्य (डॉ. वनिता पटवर्धन)
- खिन्नता नकोच (प्रा. मणिलाल गदा)
- खेळाचे मानसशास्त्र (रवींद्र बळीराम खंदारे)
- जऽऽरा थांबा, विचार करा! (अलका काकडे)
- तणाव प्रबंधन : अंतर्मनाच्या आनंदयात्रेतील अडथळा (मनीषा प्रमोद मुलकलवार)
- ताणतणावाचे व्यवस्थापन (प्राचार्य गुलाबराव खेडेकर)
- तारुण्यातून प्रौढत्वाकडे (संपादन- डॉ. वनिता पटवर्धन)
- पॉवर थिंकिंग : धैर्य आणि आत्मविश्वासाचा खजिना (मूळ इंग्रजी लेखक - नॉर्मन व्हिंन्सेंट पील, मराठी अनुवादक - उमा अष्टपुत्रे)
- प्रभावी व्यक्तिमत्त्व (डॉ. अशोक निरफरके व वनिता पटवर्धन)
- प्रात्यक्षिक शरीरक्रिया विज्ञान (शिल्पा कांतीलाल इंगळे)
- बालमानसशास्त्र ते बालमानसशास्त्र (सुधीर संत)
- बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र (अशोक मते)
- ब्रेन प्रोग्रॅमिंग (डॉ. रमा मराठे)
- मतिमंदत्व: स्थिती आणि परिस्थिती (संध्या देवरुखकर)
- मनकल्लोळ भाग - १ व २ (अच्युत गोडबोले, नीलांबरी जोशी)
- मनगंगेच्या काठावरती (डाॅ रमा मराठे)
- मन मनोबळ मनोसिद्धी (वनराज मालवी)
- मनाचे व्यवस्थापन: अंतिम सत्य या इथं आहे. मनाच्या सर्व रहस्यांचा मर्मभेद करणारा एकमेव निर्णायक ग्रंथ, आजपावेतो सर्व जग मनाच्या रहस्यांबाबत अनभिज्ञ होतं. हा ग्रंथ आहे त्या साऱ्या रहस्यांची परिपूर्ण उकल करणारा जगात प्रथमच निर्विवादपणे (संजय पंडित)
- मनाच्या अंतरंगात : मनोविकारांकडून ..समुपदेशन .. मनःस्वास्थ्याकडे (डाॅ. मिलिंद पोतदार)
- मना मना दर उघड (शोभा पाटकर)
- मनोमापनाच्या प्रांती (सोपान बोराटे)
- मनोविकृती मानसशास्त्र (एस.यू. अहिरे)
- माईंड प्रोग्रामिंग (मूळ इंग्रजी लेखक - अल्बर्ट एलिस, मराठी अनुवादक - चंद्रशेखर पांडे, डॉ. श्रीकांत चोरघडे)
- मानसप्रज्ञा (डॉ. के.पी. निंबाळकर)
- मानसरंग : मानसशास्त्र तरुणांचे (डॉ. अनुराधा सोवनी)
- मानसशास्त्र (संपाद - म.न. पलसाने)
- मानसशास्त्राची मूलतत्त्वे - भाग १, २ (बी.एस. पवार, डॉ. जी.बी. चौधरी)
- मानसशास्त्रीय चाचण्या (डॉ. अनिता पाटील)
- मानसिक आजारातून सावरताना … (अनिल वर्तक)
- मानसिक ताणतणाव कसा रोखाल? (डॉ. राजेंद्र बर्वे)
- मुलांना वाढवावे कसे (अरुण रामकृष्ण गोडबोले)
- यशाचं मानसशास्त्र (सेतुमाधव संगोराम)
- रंग मनाचे (संपादन- डॉ. स्वर्णलता भिशीकर)
- रंग समुपदेशनाचे (संपादन- डॉ. वनिता पटवर्धन)
- रोज नवी सुरुवात (सविता आपटे} . प्रकाशक - डाॅ. आनंद नाडकर्णी.
- विकार मनाचे (डॉ. हिमानी चाफेकर)
- विवेकाचं दुसरं नाव विचार आहे : आजच्या काही महत्त्वाच्या समस्या व त्यावरील उपाय (डाॅ. विवेक क्षीरसागर)
- व्यसने आणि मेंदू (डॉ. चंद्रकांत सहस्रबुद्धे)
- संभ्रमाचे सांगाती (नंदू मुलमुले)
- समुपदेशन मानसशास्त्र : आशय, प्रक्रिया आणि उपचारपद्धती (डाॅ. बेनहर पवार, डाॅ. गोकुळ चौधरी )
- संमोहन आणि आत्मशक्तीचा विकास (सुधीर संत)
- संमोहन उपचार : काळाची गरज - शोध अंतर्मनातील सामर्थ्याचा (डॉ. राज)
- सामर्थ्य स्व-संमोहनाचं : संमोहन शास्त्र आणि मनाचा विकास (भालचंद्र साठे )
- सामाजिक मानसशास्त्र (डॉ. निशा मुंदडा, सतीश सूर्य)
- सामाजिक मानसशास्त्र (प्रा. रा.ना. घाटोळे)
- सामाजिक मानसशास्त्र (पुंडलिक वि. रसाळ)
- सामान्य मानसशास्त्र (आशा परुळेकर, सविता देशपांडे)
- सिगमंड फ्रॉइड विचारदर्शन (साधना कामत)
- सुसंवाद मनामनातील (डाॅ. आशा परांजपे)
- स्किझोफ्रेनिया - एक नवी जाणीव (कल्याणी गाडगीळ)
- हीलिंग - एक प्रकाशवाट (वृषाली गिरीश लेले)
- आधुनिक सामान्य मानसशास्त्र -प्रा.आर.यु. जाधव
- सामान्य मानसशास्त्र - राणे एस. चौधरी जी. पवार बी.
- मानसशास्त्र -सिसरेली एस.के.मेयर एम.इ.
- सामान्य मानसशास्त्र - बडगुजर सी.बच्छाव ए. शिंदे व्ही.
- मानसशास्त्राची मूलतत्त्वे -प्रा.पंडित र.वि.
- समुपदेशन -प्रा.देशपांडे चंद्रशेखर
- भावनिक बुद्धिमत्ता -दलीपसिंह अनुवाद -चारुता पुराणिक
- मनप्रवाह : प्रा डॉ महेश पाटील (विटा-सांगली)
(अपूर्ण यादी)
दुवे
[संपादन]मानसशास्त्र - व्याख्या वर्तन आणि मानसिक प्रक्रियांचा शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय.
- अमीबावेब मानसशास्त्राची साधने Archived 2005-06-27 at the Wayback Machine.
- Institute of Psychosomatic Integration
- इव्हान पावलाव्ह -अभिसंधानाच्या संशोधनासाठी नोबेल पारितोषिक प्राप्त करणारे
- उपयोजित मानसशास्त्र (A, Bhagvatwar P. (1978). Upyojit Manasshastra (en मजकूर). M.V.G.N.M.)
- एडवर्ड थोर्नडायिक -अध्ययनाच्या संदर्भात मोलाचे संशोधन केले आहे.
- घडामोडी Archived 2006-10-20 at the Wayback Machine.
- जे.बी.वाटसन -१८७८-१९५८ हे एक वर्तनवादी मानसशास्त्रज्ञ
- ताज्या घडामोडी Archived 2006-04-11 at the Wayback Machine.
- पोलंडमध्ये वापरलेल्या पद्धतींसंबंधी दुवे
- बी.एफ.स्किनर-१९०४ यांनी उद्दीपक व साहचर्य यांचा संबंध स्पष्ट केला.
- प्राचीन मानसशास्त्रातील शोध
- PsyDok, मानसशास्त्र मुक्तकोश Archived 2015-02-27 at the Wayback Machine.
- मानसशास्त्र : सर्च इंजिन Archived 2016-03-05 at the Wayback Machine.
- मानसशास्त्राचा शब्दकोश
- मानसशास्त्राचा विश्वकोष
- मानसशास्त्रातील परिशिष्टे
- सायकोवर्ल्ड.एसके - मानवी मानसशास्त्र घडामोडी Archived 2006-08-21 at the Wayback Machine.
- डॉ.सिगमंड फ्राईड -१८५६-१९३९ यांनी मनोविश्लेषण सिद्धांताद्वारे मानसशास्त्राच्या जगात अबोध प्रेरणेचे महत्त्व मांडून खळबळ उडवून दिली. त्यांनी व्यक्तीच्या शारीरिक आजारांचा संबंध अबोध मनाशी आसतो असे मत प्रखरपणे मांडले.
- केरळामधील शोधपत्रे Archived 2006-10-22 at the Wayback Machine.
- भारतीय मानसशास्त्रावरील शोधनिबंध Archived 2006-03-14 at the Wayback Machine.
- प्राचीन भारतीय मानसशास्त्राचा इतिहास Archived 2007-01-06 at the Wayback Machine.
- योगमानशास्त्र[permanent dead link]
- एपीए.ऑर्ग - शतकातील मानसशास्त्र
- सायकॉलजी टुडे - मानसशास्त्रज्ञांची माहिती'=जर्मन शरीरशास्त्रज्ञ विलहेम वुंट -याने १८७९ मध्ये जर्मनीत लिपझिक विद्यापीठात मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा स्थापन करून मानसशास्त्राला शास्त्रीय दर्जा मिळवून दिला आणि मानसशास्त्राला एक नवीन ओळख प्राप्त करून दिली. त्यामुळे विल्यम वून्टला आधुनिक मानसशास्त्राचा जनक म्हणतात.
- ^ A, Bhagvatwar P. (1978). Upyojit Manasshastra (इंग्रजी भाषेत). M.V.G.N.M.