Jump to content

महाराष्ट्र मंडळ (बंगळूर)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

महाराष्ट्र मंडळ, बेंगलोर ही कर्नाटकची राजधानी बंगळूर येथील संस्था आहे.

या संस्थेची स्थापना इ.स.१९२०मध्ये झाली. गांधीनगर ह्या बंगलोरातील मध्यवर्ती ठिकाणी मंडळाची स्वतःची जागा व वास्तू आहे. बंगळूर शहर रेल्वे आणि बस स्थानकापासून मंडळात १० मिनिटांत पायी पोचता येते. येथे मराठी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. मंडळाचे वधुवर संशोधन मंडळ आहे.

गणेशोत्सव हा मंडळाचा वर्षातला सर्वात मोठा सोहळा असतो. दहा दिवसांतील एखाद्या रविवारी महाप्रसाद असतो. त्याच दिवशी सकाळी प्रसिद्ध महाराष्ट्रीय कलावंताचा लोकप्रिय कार्यक्रम ठेवला जातो. स.न.वि.वि. हे मंडळाचे मासिक असून याचा गणेशोत्सव विशेषांक प्रकाशित होतो. बंगळूरमधील हौशी कलाकारांसाठी एकांकिका स्पर्धा या दहा दिवसांत आयोजित होते.

बंगलोरच्या महाराष्ट्र मंडळात बाहेरगावच्या मराठी पाहुण्यांना उतरायची सोय आहे. पूर्वी येथे संस्थेचे उपाहारगृह होते. आता ते वेगळ्याच नावाने दुसरे कुणीतरी चालवते. मराठी खाद्यपदार्थ आता येथे मिळत नाहीत, त्यांसाठी समोरच्या हॉटेलमध्ये जावे लागते.

पत्ता: २ रा क्रॉस, गांधीनगर, बेंगलोर ५६० ००९ दूरभाष: +९१ ८० २२२६ २१७६ ई-मेल ग्रुप: [१] संकेतस्थळ:[[२]], [[३]]