बाहुली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बाहुली ही मनुष्याची छोट्या रूपातील प्रतिमा किंवा वस्तू होय.[ संदर्भ हवा ] बाहुली ही खेळणे म्हणून जास्त वापरली जाते. तसेच जादूटोणासारख्या प्रथा आणि धार्मिक विधीमध्ये मूर्ती म्हणून वापरली जाते. बाहुलीचा वापर सिंधू, जपानी, ग्रीक, इजिप्त, आफ्रिका इ. संस्कृतींत खूप प्राचीन काळापासून केला गेला आहे.[१] रुथ हॅंडलर यांने बार्बी या बाहुलीची निर्मिती १९५९ साली केली, जी व्यापारीदृष्ट्या सर्वात जास्त यशस्वी ठरली.[२]

उत्पादन[संपादन]

बाहुल्या या लाकूड, माती, धातू, कापड, गवत, कागद इ. विविध माध्यमे वापरून तयार केल्या जातात.[ संदर्भ हवा ] कारागीर हाताने या बनवितात तसेच मोठ्या प्रमाणावर कारखान्यातसुद्धा तयार उत्पादित केल्या जातात. यामध्ये प्लास्टिक, धागे, कठीण दगड व विविध मौल्वान धातू वापरले जातात.[३]

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ घाटे, निरंजन (२०१५). जिज्ञासापूर्ती. पुणे: मेहता पब्लिशिंग हाऊस.
  2. ^ तोसा, मार्को (२०००). Barbie: Four Decades of Fashion, Fantasy, and Fun.
  3. ^ गोखले, श्री. पु. "बाहुली (डॉल)". विकासपिडिया. १७ मार्च २०१९ रोजी पाहिले.