बाहुलीचा हौद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

बाहुलीचा हौद हा पुण्यातील शुक्रवार पेठेतील दगडूशेठ दत्त मंदिराजवळ असलेला हौद होता.

पुण्यातील शल्यविशारद डॉ.विश्राम घोले यांनी आपली मुलगी काशीबाई तथा बाहुली हिच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा हौद बांधला होता. हौदाच्या मध्यभागी काशीबाईचे बाहुलीरूपातले शिल्प होते. हा हौद पहिल्यापासूनच सर्व जातिधर्मातील लोकांसाठी खुला होता.

महात्मा फुले यांच्यापासुन प्रेरणा घेऊन त्यांनी स्त्री शिक्षणाची पालखी आपल्या खांद्यावर घेतली. सुरवात आपल्या घरातुन करण्यासाठी त्यांनी आपली लाडकी कन्या बाहुली. हिला शिकवण्यास सुरवात केली. बाहुली खरोखरच नावाप्रमाणे बाहुली वय अवघे ६-७ वर्ष..

अतिशय हुशार कुशाग्र आणि चुणचुणीत.बाहुलीच्या शिकण्याला डॉ. घोले यांचे पाठबळ असले तरी घरातील जेष्ठ व्यक्ती, महिलांना त्यांची ही कृती पूर्ण नापसंत होती, किंबहुना प्रखर विरोध होता.अनेकदा डॉ.घोले यांना समजविण्याचा प्रयत्न जातीतील मान्यवरांनी केला.जातीतून बहिष्कृत करण्याची धमकी दिली.


पण डॉ.घोले यांनी कुठल्याही अडचणीला भीक घातली नाही.शेवटी काही नतद्रष्ट नातेवाईक व्यक्तिंनी काचा कुटुन घातलेला लाडु बाहुलीस खावयास दिला. अश्राप पोर ती काचांचा लाडु खाल्ल्या मुळे अंतर्गत रक्तस्त्राव होऊन मृत्यूमुखी पडली.

स्त्री शिक्षणाचा हा पहिला ज्ञात बळी आपल्या लाडक्या लेकीच्या स्मरणार्थ डॉ. घोल्यानी बाहुलीचा हौद बांधला आणि तो सर्व जातीधर्मातील लोकांसाठी खुला ठेवला.त्याचा लोकार्पण सोहळा मातंग समाजातील थोर सुधारक दादा भुतकर यांच्या हस्ते भाऊबीजेच्या दिवशी ठेवल्याची नोंद आहे. पण इतिहासात बाहुलीच्या जन्म मृत्युच्या तारखेची नोंद मात्र आढळत नाही.

काळ बदललाय कालपटावरील आठवणी धुसर झाल्यात. डॉ. विश्राम घोले यांच्या नावाचा घोले रोड आता सतत वाहनांच्या वर्दळीने धावतपळत असतो. पुर्वी शांत निवांत असलेली बुधवार पेठ आज व्यापारी पेठ म्हणून गजबुन गेलीये.