बारामती नगरपालिका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बारामती येथे ब्रिटिश काळात म्हणजे १ जानेवारी १८६५ साली बारामती नगरपालिकेची स्थापना झाली. या नगरपालिकेच्या पहिल्या महिला सदस्या शारदाबाई गोविन्दराव पवार या होत्या. आज या नगरपालिकेस १५० वर्षे उलटून गेली आहेत. इ.स. १८८१ मध्ये झालेल्या जनगणनेनुसार तत्कालीन बारामतीची लोकसंख्या पाच हजार दोनशे बाहत्तर इतकी होती. आज तो आकडा लाखाच्या ही वर गेला आहे. [१]

  1. ^ Critical Analysis of the Social Movements in Baramati Minor Research Project UGC Dec 2015 by Dr. D. A . More, pp 2