नंदू माधव
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
नंदू माधव | |
---|---|
जन्म | नंदू माधव |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
भाषा | मराठी |
वडील | माधव |
आई | पार्वती |
अधिकृत संकेतस्थळ | http://nandumadhav.com/ |
नंदू माधव हे अभिनेते, लेखक, नाट्य-चित्रपटदिग्दर्शन या क्षेत्रांत आहेत, हरिश्चंद्राची फॅक्टरी या चित्रपटातील त्यांनी साकारलेली दादासाहेब फाळके यांची व्यक्तिरेखा विशेष गाजली, हा चित्रपट भारतातर्फे सन २०१० मध्ये ऑस्कर पुरस्कारासाठी पाठवण्यात आला होता. आजवर त्यांनी सरकारनामा, बनगरवाडी, टपाल, जण गण मन अशा अनेक चित्रपटांमधून साकारलेल्या व्यक्तिरेखा विशेष गाजल्या. तसेच नंदू माधव यांनी दिग्दर्शित केलेले 'शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला' हे शिवाजी महाराजांची राज्यकारभारातली धोरणे, सर्वधर्मसमभाव यांचे मार्मिक सादरीकरण करणारे नाटक देखील विशेष गाजले . बनगरवाडी चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना १९९५ साली "सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता" म्हणून महाराष्ट्र राज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. टपाल (२०१३), हरिश्चंद्राची फॅक्टरी (२०१०) या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांनी स्क्रीन मासिकाकढून बेस्ट अभिनेता हा, तसेच जण गण मन (२०१२), शाळा (२०१२), मुक्ती (२०१२) या चित्रपटांतील अभिनयासाठी महाराष्ट्र राज्य विशेष परीक्षक पुरस्कार देण्यात आला.