Jump to content

दलाल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ब्रोकर ही एक अशी व्यक्ती असते जी खरेदीकर्ता आणि विक्रेत्यादरम्यान, तो व्यवहार झाल्यानंतर कमिशन मिळविण्यासाठी एखादा व्यवहार घडवून आणते. ब्रोकर एक विक्रेता किंवा एक खरेदीकर्त्याची देखील भूमिका बजावतो आणि त्या व्यवहारात एक प्रमुख पक्ष बनतो. यातील कोणत्याही भूमिकेचा एखाद्या एजंटच्या भूमिकेशी गैरसमज करून घेतला जाऊन नये, जो त्या व्यवहारातील प्रमुख पक्षाच्या वतीने असतो. []

व्याख्या

[संपादन]

एक ब्रोकर एक स्वतंत्र पक्ष असतो, ज्याच्या सेवा काही उद्योगांद्वारे मोठ्या प्रमाणावर वापरल्या जातात. विक्रेते आणि खरेदीकर्त्यांना एकत्र आणणे ही ब्रोकरची मुख्य जबाबदारी असते आणि अशा प्रकारे ब्रोकर खरेदीकर्ता आणि विक्रेता यांच्या दरम्यान एक त्रयस्थ-पक्ष समन्वयक असतो. याचे एक उदाहरण म्हणजे एकदा रियल इस्टेट ब्रोकर एखाद्या मालमत्तेच्या विक्रीस सुकर बनवितो. []

ब्रोकर्स किमती, उत्पादने आणि बाजारपेठेची स्थिती यांच्यासंदर्भात बाजारपेठेची माहिती देखील देऊ शकतात. ब्रोकर्स विक्रेत्याचे किंवा खरेदीकर्त्याचे प्रतिनिधित्व करू शकतात, पण एकाच वेळी दोघांचे प्रतिनिधित्व करू शकत नाहीत. उदा. एखादा स्टॉकब्रोकर त्याच्या ग्राहकाच्या वतीने रोख्यांची खरेदी किंवा विक्री करतो. भाग, रोखे आणि इतर आर्थिक सेवांमध्ये ब्रोकर्स फार महत्त्वाची भूमिका बजावतात.

एक ब्रोकर वापरण्यामागे काही फायदे असतात. सर्वात पहिले, त्यांना त्यांची बाजारपेठ माहित असते आणि संभाव्य खात्यांसह त्यांचे अगोदरच संबंध प्रस्थापित असतात. ब्रोकर्सकडे खरेदीकर्त्याच्या संभाव्य असा विस्तार मोठा असतो. ते नंतर त्या संभाव्य व्यवहारातील महसुलीसाठी सक्षम ठरतील अशा संभाव्य खरेदीकर्त्यांची तपासणी करतात. दुसऱ्या बाजूला एखादा स्वतंत्र उत्पादक, खास करून त्या बाजारपेठेसाठी नवा असेल, तर त्याला एखाद्या ब्रोकरइतकी ग्राहकांविषयी माहिती नसण्याची शक्यता असते. एक ब्रोकर वापरण्याचा दुसरा फायदा म्हणजे खर्च असतो- लहान बाजारपेठांमध्ये, लहान खात्यांसह किंवा उत्पादनांच्या सीमित श्रेणीसह ते अतिशय किफायतशीर असू शकतात. [] []

एखाद्या ब्रोकरला नियुक्त करण्यापूर्वी, असे शीर्षक वापरणाऱ्या व्यक्तीशी संबंधित गरजांचे संशोधन करणे शहाणपणाचे ठरेल. काही शीर्षक, जसे रियल इस्टेट ब्रोकर्स, ज्यांच्यासाठी ते शीर्षक वापरण्यासाठी काटेकोर अशा गरजा असतात, तर इतरांसाठी, जसे एअरक्राफ्ट ब्रोकर्ससाठी कोणत्याही औपचारिक लायसन्सिंग किंवा प्रशिक्षणाची आवश्यकता नसते.

व्युत्पत्ती

[संपादन]

"ब्रोकर” हा शब्द जुना फ्रेंच शब्द ब्रोकियरवरून आला आहे ज्याचा अर्थ “लहान व्यापारी”, काहीशा अनिश्चित मुळावरून आला आहे, पण ही पण शक्यता आहे की तो, जुना फ्रेंच शब्द ब्रोकियोर म्हणजे “वाईनचा किरकोळ विक्रेता”वरून आला आहे, जे ब्रोकियर किंवा “विषय काढणे (केज)” या क्रियापदावरून आले आहे.[]

ब्रोकर्सचे प्रकार

[संपादन]
  • ब्रोकर-डीलर
  • ब्रोकरेज फर्म
  • बिजनेस ब्रोकर
  • कार्गो ब्रोकर
  • ऑटो ट्रान्सपोर्ट ब्रोकर
  • कमोडीटी ब्रोकर
  • कस्टम्स ब्रोकर
  • इन्फर्मेशन ब्रोकर
  • इन्शुरन्स ब्रोकर []
  • इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी ब्रोकर
  • इन्व्हेस्टमेंट ब्रोकर
  • जॉइंट वेंचर ब्रोकर
  • लिस्ट ब्रोकर
  • मॅरेज ब्रोकर
  • मेसेज ब्रोकर
  • मॉर्टगेज ब्रोकर
  • ऑप्शन्स ब्रोकर
  • पॉनब्रोकर
  • पॉवर ब्रोकर  (अवधी)
  • प्राईम ब्रोकर
  • रियल इस्टेट ब्रोकर
  • शिप ब्रोकर
  • स्पॉन्सरशिप ब्रोकर
  • स्टॉक ब्रोकर
  • शेअर ब्रोकर
  • ऑफिस ब्रोकर
  • सर्विस्ड ऑफिस ब्रोकर
  • याच ब्रोकर

संदर्भ व नोंदी

[संपादन]
  1. ^ a b c स्पीरो, रोझन एल., विल्यम जे. स्टॅटन, आणि ग्रेगरी ए रिच. मॅनॅजमेण्ट ऑफ अ सेल्स फोर्स. १२वी आवृत्ती बोस्टन: मॅग्रा-हिल / इरविन, २००३
  2. ^ "दलाल" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  3. ^ "ब्रोकर" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  4. ^ "इन्शुरन्स ब्रोकर म्हणजे काय?" (इंग्लिश भाषेत). 2018-08-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-07-16 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)