डोरले
Appearance
डोरले हे महाराष्ट्रातील स्त्रियांचे आभूषण आहे.
एके काळी डोरले हे प्रत्येक मराठी विवाहित स्त्रीचे धन मानले जात असे. डोरले हा मंगळसूत्राचाच प्रकार आहे. अलीकडे त्याची जागा मंगळसूत्राने घेतली आहे. डोरले सोन्यापासून बनवले जाते. डोरले वेगवेगळ्या आकाराचे असते. एक ग्रॅम पासून ते पाहिजे त्या वजनाची डोरली तयार करता येतात.