डेकॅथ्लॉन
Appearance
डेकॅथ्लॉन हा ऑलिंपिक स्पर्धांमध्ये होणारा एक क्रीडाप्रकार आहे. ह्यात एकूण दहा स्पर्धा असतात, त्या अशा :-
- १०० मीटर धावणे
- लांब उडी
- गोळा फेक
- उंच उडी
- ४०० मीटर धावणे
- ११० मीटरची अडथळ्याची शर्यत
- थाळीफेक
- बांबू उडी
- भालाफेक
- १५०० मीटर धावणे
यांतल्या काही स्पर्धा पहिल्या दिवशी, आणि काही दुसऱ्या दिवशी होतात.
महिला खेळाडूंसाठी याच स्पर्धा किरकोळ फरकाने होतात.