जुवेनाल हब्यारिमाना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जुवेनाल हब्यारिमाना

जुवेनाल हब्यारिमाना (Juvénal Habyarimana; ८ मार्च १९३७ - ६ एप्रिल १९९४, किगाली) हा ऱ्वांडा देशाचा तिसरा राष्ट्राध्यक्ष होता. ऱ्वांडाचा लष्कराप्रमुख असताना १९७३ साली तत्कालीन राष्ट्राध्यक्ष ग्रेगोइर कायिबंदा ह्याची सत्ता उलथवून हब्यारिमाना सत्तेवर आला. त्याने पुढील २१ वर्षे एका हुकुमशहाच्या शैलीमध्ये ऱ्वांडावर सत्ता गाजवली. ६ एप्रिल १९९४ रोजी हब्यारिमाना प्रवास करत असलेले विमान किगालीजवळ पाडण्यात आले ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृत्यू हे ऱ्वांडामधील जनसंहाराचे प्रमुख कारण होते.