जुवेनाल हब्यारिमाना
Jump to navigation
Jump to search
जुवेनाल हब्यारिमाना (Juvénal Habyarimana; ८ मार्च १९३७ - ६ एप्रिल १९९४, किगाली) हा रवांडा देशाचा तिसरा राष्ट्राध्यक्ष होता. रवांडाचा लष्कराप्रमुख असताना १९७३ साली तत्कालीन राष्ट्राध्यक्ष ग्रेगोइर कायिबंदा ह्याची सत्ता उलथवून हब्यारिमाना सत्तेवर आला. त्याने पुढील २१ वर्षे एका हुकुमशहाच्या शैलीमध्ये रवांडावर सत्ता गाजवली.
६ एप्रिल १९९४ रोजी हब्यारिमाना प्रवास करत असलेले विमान किगालीजवळ पाडण्यात आले ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृत्यू हे रवांडामधील जनसंहाराचे प्रमुख कारण होते.