जुनागढ संस्थान
जुनागड संस्थान જૂનાગઢ રજવાડું | ||||
|
||||
|
||||
राजधानी | जुनागड | |||
अधिकृत भाषा | गुजराती | |||
क्षेत्रफळ | ८६४३ चौरस किमी | |||
लोकसंख्या | ४६५४९३ |
जुनागड संस्थान हिंदुस्थानातील पश्चिमेला सौराष्ट्राचा समुद्र किनारा व इतर बाजूंना भारतीय भू असलेले, पाकिस्तानशी भौगोलिक सलगता नसणारे संस्थान होते. या संस्थानाच्या नबाबाने पाकिस्तानमध्ये विलीन होण्याची तयारी केली होती.
विलीनीकरण
[संपादन]महाबतखान हा या संस्थानचा नबाब होता. जुनागडचे क्षेत्रफळ ३०,३३७ चौ. मैल. होते, तर लोकसंख्या ६,७०,७१९ एवढी होती. त्यापैकी ८० टक्के हिंदू तर २० टक्के प्रजा मुसलमान होती. १५ ऑगस्ट १९४७ रोजी नबाब महाबतखान याने जुनागड संस्थान पाकिस्तानमध्ये सामील होत असल्याचे जाहीर केले. बॅ. जीनांशी त्याने गुप्तपणे पत्रव्यवहार केला. पाकिस्तान सरकारने १३ सप्टेंबर १९४७ जुनागड संस्थान पाकिस्तानात विलीन होत असल्याचे भारत सरकारला कळविले याबाबत जुनागडशी जैसे थे (स्टॅड स्टिल) करार झाल्याचे जाहीर केले
नबाबाच्या निर्णयामुळे जुनागड संस्थानातील जनतेला धक्का बसला.. ८० टक्के जनता हिंदू असताना कोणत्याही प्रकाराचा विचार न घेता नाबाबने घेतलेला निर्णय आपला अवमान असल्याचे प्रजेला वाटले. त्यांनी नबाबाच्या विरोधात आंदोलन उभारले नबाब महाबतखान चैनी, विलासी व ऐषआरामी होता. जुनागड पाकिस्तानमध्ये सामील करून आपल्या हातून चूक होते आहे. असे नबाबास वाटले नाही. जुनागडमधील प्रजेने केलेल्या आंदोलनाला भारत सरकारने पाठिंबा दिला. जुनागडच्या आसपासची नवानगर, भावनगर, गोंडल ही संस्थाने यापूर्वीच भारतात सामील झाली होती. भारत सरकारने २४ सप्टेंबर १९४७ रोजी जुनागडमध्ये लष्करी कारवाई केली. नबाब महाबतखानास पाकिस्तानाला पळून जावे लागले. यानंतर शामळदास गांधी यांच्या नेतृत्वाखाली काठियावाड जनता आघाडीच्या हंगामी सरकारची स्थापना झाली. फेब्रुवारी १९४८ मध्ये जुनागडमध्ये सार्वमत घेण्यात येऊन जुनागड संस्थानाचे भारतात विलीनीकरण करण्यात आले
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |