चर्चा:जुनागढ संस्थान

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

एक नोंद: जुनागढ़ संस्थानाची नोंद मराठी विकिपीडियात चुकून "पाकिस्तानी संस्थाने" या मथळ्याखाली झाली होती. याविषयी असे नमूद करावेसे वाटते, की जुनागढ़ संस्थान सध्या पाकिस्तानात नसून भारताच्या गुजरात राज्यात आहे. पाकिस्तानने त्यावर दावा केला होता, व जुनागढ़च्या नवाबाने पाकिस्तानात विलीन होण्याचाही प्रयत्न केला होता, परंतु तेथील जनतेच्या इच्छेनुसार हे संस्थान आपण पुढे भारतात विलीन करून घेतले, व (माझे इतिहासाचे त्रोटक ज्ञान बरोबर असेल तर) जुनागढ़च्या नवाबास पाकिस्तानास पळून जावे लागले. तरी हे संस्थान "पाकिस्तानी संस्थानां"त घालणे योग्य नाही, म्हणून योग्य ती सुधारणा स्वतःच करण्याचा प्रमाद (आगाऊपणा म्हणा हवे तर) केला आहे.

- आपला नम्र,

--टग्या 22:17, 12 जुलै 2005 (UTC)