जपानचे शाही सैन्य
Appearance
जपानचे शाही सैन्य (जपानी:大日本帝國陸軍; दै-निप्पॉन तैकोकु रिकुगुन; बृहद् जपानच्या साम्राज्याचे सैन्य) तथा इंपेरियल जॅपनीझ आर्मी हे जपानच्या साम्राज्याचे १८६८ ते १९४५ दरम्यानचे अधिकृत सैन्यबल होते.
याची मुखत्यारी शाही जपानी सैन्याच्या जनरल स्टाफ ऑफिस[मराठी शब्द सुचवा] आणि युद्ध मंत्रालयाकडे होती. या दोन्ही संस्था नावापुरत्या जपानच्या सम्राटाला आधीन होत्या.