Jump to content

छत्रसाल बुंदेला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
छत्रसाल बुंदेला

छत्रसाल बुंदेला (जन्म : ४ मे १६४९; - २० डिसेंबर] १७३१) हा मुघल साम्राज्याच्या विरोधात शस्त्र उठवून बंड करणारा एक शूर राजा होता. याने पन्ना संस्थानची स्थापना केली. इ.स. १६२७ मध्ये हा 'जगज्जेता' चक्रवर्ती बादशाहा मृत्यू पावला, व त्याचा मुलगा शहाजहान हा दिल्लीपदावर अधिष्ठित झाला. तो पुनः बीरसिंगदेव अधमपणा स्वीकारून बाहशाहाच्या मुलुखात दंगेधोपे व लूटमार करू लागला. हे वृत्त बादशाहास समजताच त्याने त्याची खोड मोडून त्याची सर्व जहागीर जप्त केली. त्या वेळेपासून सन १७०७ पर्यंत झाशीप्रांत दिल्लीच्या बादशहाकडे होता. पुढे सन १७०७ मध्ये, बहादूरशाहा गादीवर आल्यानंतर त्याने झाशी परगणा छत्रसाल राजास जहागीर दिला.

राजा छत्रसालबद्दल पुढील पंक्ती प्रसिद्ध आहेत :

तोड़ादार घोड़ादार
वीरनि सों प्रीति करी
साहस सों जीति जंग
खेत ते न चालियौ
बिन्ती छत्रसाल करै
होय जो नरेस देश
रैहे न कलेस रेस
मेरो कह्यो पालियौ

छत्रसाल याची मराठी चरित्रे

[संपादन]
* बुंदेलखंडचा महाराजा छत्रसाल (सदाशिव आठवले)