Jump to content

चार्ल्सटन (साउथ कॅरोलिना)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चार्ल्सटनच्या मध्यवर्ती भागातील समुद्रकिनारा
चार्ल्सटनमधील काही ऐतिहासिक इमारती व घरे
कॅलहून मॅन्शन
फोर्ट सम्टर आणि रेव्हेनेल पूल

चार्ल्सटन अमेरिकेच्या साउथ कॅरोलिना राज्यातील मोठे शहर आहे. राज्यातील सगळ्यात जुनी युरोपियन वसाहत असलेले हे शहर चार्लस्टन काउंटीचे प्रशासकीय केंद्र असून २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,२०,०८३ होती.[] तर महानगराची लोकसंख्या अंदाजे ७.१२,२२० होती.

हे शहर इ.स. १६७०मध्ये पहिल्यांदा चार्ल्स टाउन या नावाने वसवले गेले. इंग्लंडचा त्यावेळचा राजा चार्ल्स दुसऱ्याचे हे नाव त्यावेळी दिले गेले होते. १७८३मध्ये हे नाव बदलून चार्ल्सटन केले गेले. इ.स. १६९०मध्ये हे शहर अमेरिकेतील पाचव्या क्रमांकाचे मोठे शहर होते.[] १८४० च्या जनगणनेपर्यंत हे शहर अमेरिकेतील मोठ्या दहा शहरांपैकी एक होते.[]

चार्ल्सटन ॲशली नदी आणि कूपर नदीच्या संगमातून तयार झालेल्या खाडीजवळ वसलेले आहे.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "Geographic Identifiers: 2010 Demographic Profile Data (G001): Charleston city, South Carolina". २०१४-०४-०४ रोजी पाहिले.
  2. ^ "Charleston Time Line". 2001-07-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २००७-०८-०९ रोजी पाहिले.
  3. ^ "Population of the 100 Largest Urban Places: 1840".