चरखा
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
चरखा हे नैसर्गिक (जसे:कापूस किंवा लोकर इत्यादी) किंवा कृत्रिम वस्तुंपासून सूत कातण्याचे एक साधन आहे.याचा वापर बहुतेक आशियात ११व्या शतकाचे सुमारास सुरू झाला.हातांनी सूत कातण्याच्या पद्धतीला याने पर्याय दिला.भारतात याचा वापर तेराव्या शतकाचे सुमारास सुरू झाला.
भारतात गांधीजींनी याचा प्रसार केला.याद्वारे ते सूतकताई करून त्याची वस्त्रे बनवित असत. स्वदेशी वस्तु वापरण्याकडे त्यांचा कल होता.
चरख्यांचे प्रकार
[संपादन]- लाकडी चरखा
- दोन चक्रांचा चरखा
- पायानी चालवायचा चरखा
- यांत्रिक चरखा
- सोलर चरखा
- प्रवास चरखा
सूत कातण्याची पद्धत
[संपादन]भारतात हाताने सूत कातण्यासाठी टकळी व चरखा ही साधने वापरतात, असे सूत मुख्यतः खादीच्या कापडासाठी वापरतात [ → खादी उद्योग]. जानव्याच्या सुतासारखे सूत कातण्यासाठी खेड्यात अजूनही टकळी वापरतात. टकळीवरील सूतकताईची पद्घत चातीवरील सूतकताईसारखी आहे. एका टोकाशी काहीसा आकड्यासारखा आकार दिलेली जाडसर तार व दुसऱ्या टोकाजवळ बसविलेली वजनदार तबकडी असे टकळीचे स्वरूप असते. ही तबकडी ⇨ प्रचक्रा चे किंवा जड चक्राचे काम करते. डाव्या हातातील कापसाचा पुंजका वा पेळू टकळीच्या आकड्यासारख्या टोकाला अडकवून तो हात वर नेतात. यामुळे कापसाचे तंतू ओढले जाऊन त्यांची परस्परव्यापी, जवळजवळ समांतर मांडणी होऊन तंतूंची लांब रचना तयार होते. नंतर टकळी उजव्या हाताने वर्तुळाकार फिरवून तंतूंना थोडा पीळ देतात. यामुळे तंतूंची सैलसर वात तयार होते. नंतर टांगलेल्या मुक्त स्थितीत टकळी उजव्या हाताने जोराने फिरवितात. टकळीच्या वजनदार तबकडीला संवेग मिळून तंतूंना पीळ बसत असताना ते खाली खेचलेही जातात. अशा रीतीने पुरेशा लांबीचे म्हणजे हातभर सूत तयार झाले की ते टकळीच्या तारेवर गुंडाळतात. नंतर ही सर्व प्रक्रिया पुनःपुन्हा करून सूत कातले जाते. हलक्या स्थितीतील टकळीचे वजन पेलू न शकणाऱ्या तंतूंच्या बाबतीत टकळी जमिनीवर टेकवून सूतकताई करतात. टकळी व चाती हजारो वर्षांपासून वापरली जात असून ईजिप्तमध्ये लिननचे सूत कातण्यासाठी, तर भारतात कच्चे सुती धागे कातण्यासाठी तिचा वापर होतो.[१]
संदर्भ
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]- ^ [vishwakosh.marathi.gov.in/26021 सूतकताई]