Jump to content

गांधार बौद्ध कला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गांधार बौद्ध कला (ग्रीको–बुद्धिष्ट आर्ट्स) म्हणजे गौतम बुद्ध यांचे कलात्मक पद्दतीने प्रगटीकरण करण्याची कला आहे. साधारण १००० वर्षापूर्वी मध्य आशिया खंडात ग्रीक आणि बौद्ध संस्कृतीचा विकास कृत्रिम रित्या झाला होता. इ.सन पूर्व ४थ्या शतकात अलेक्झांडर द ग्रेट याने विजय संपादन केल्यानंतर आणि ७व्या शतकात इस्लामिकांनी विजय प्राप्त केल्यानंतर त्यांनी बौद्ध कलेला विकशीत केले. प्रथमतः ही आदर्शवादी धर्मीय आणि ज्ञानेंद्रियांना समाधान देणारी आणि सुखद वाटणारी कला ग्रीक समुदायाने आपलीशी केली. त्यांनी अतिशय भक्कम रीतीने बुद्धांचे जीवनातील अनेक पैलू चित्रमय पद्दतीने समोर ठेवून गौतम बुद्धांचे व या कलेचे दर्शन घडविले. सध्या पूर्ण एशिया खंडात पदोपदी या कलेचे दर्शन घडते.[] पूर्ण गोलार्धातील पूर्व आणि पश्चिम परंपरागत संस्कृतिक कलात्मकतेचे दर्शन घडविणारी ही एक कला म्हणजे उत्तम उदाहरण आहे.

या कलेचे मूळं शोधले तर इ.सण पुर्व २३०-१३० दरम्यान ग्रीक मधील ग्रेको बाकट्रीयन राज्यात या कलेचा शोध मिळतो. सध्या ही अफगाणिस्थानात पाहता येते. येथून ही कला इ.सण पूर्व १८०-१० या काळात भारत देशात व या उपखंडात वाहावत आली आणि स्थिर झाली. ग्रीक आणि बौद्ध यांची चर्चा झाली आणि त्यानंतर कुशनला बरोबर घेऊन ही कला सध्याच्या उत्तर पाकिस्तानातील गांधार येथे प्रसारित झाली. या जवळीकतेने त्याचा परिणाम असा झाला की ही कला मथुरा,पर्यंत पसरली. त्यानंतर हिंदू गुप्त राजाचे राजवटीत ही कला दक्षिण आणि पूर्व एशिया मध्ये ही पोहचली. ही कला तेथेच थांबली नाही तर ती मध्य एशिया पर्यंत पसरली आणि नंतर ती तरिम बेसिन व पुढे चायना,कोरिया,जपान पर्यंत पोहचली.[]

परस्पर संवाद

[संपादन]

इंडो ग्रीक राज्य स्थापनेसाठी उत्तर पश्चिम एशिया खंडावर ग्रीक देशाने आक्रमण केले त्यातून ग्रीक आणि बुद्धिष्ट यांची विचार प्रणाली त्यांचे समोर आली. ग्रीकानी बुद्धीष्टाना धैर्य दीले आणि दानशूरपनाही दाखविला. त्यानंतर ही कला बरीच वर्षे विकशीत होत गेली आणि पहिल्या शतकात कुशन राज्याच्या काळात या कलेला चांगलाच बहर आला.

कलात्मक प्रतिमा

[संपादन]

या कलेत बुद्धांची प्रतिमा, त्यांचे जीवन, त्यांचे विचार, दृष्टी, दृष्यमान पद्दत, खरे जीवन, संकल्पना या सर्व बाबीं कलाकाराना जसजशा उपलब्ध होतील तसतशा त्या आत्मसात करून प्रतिमा निर्माण करताना स्वताःचे बौद्धिक वापरून मूर्ति साकारावायची होती. त्याला कलाकारांनी अतिशय योग्य प्राधान्य दिले.

बोधिसत्व हे चित्र रेखाटन उघड्यावरील आणि रत्नजडीत भारतीय राजशाही थाटाचे आहे आणि बुद्ध ग्रीक राजाप्रमाणे पंच्या सारख्या गाऊन या पोषाखात आहेत. ग्रीक पद्दतीच्या सर्व सुविधा संपन्न सुंदर अशा सजविलेल्या इमारतीत या प्रतिमा बसविलेल्या आहेत.[] त्याचसभोवती अनुयायासाठी ओळीने प्रार्थणा स्थळे निर्मिली आहेत. त्यात ग्रीक देशाचा नकाशा, भारतीय देवदेवतांचा समावेश आहे त्यात इंद्र देव प्रमुख आहेत.

साहित्य

[संपादन]

गांधार येथील मठ आणि मुख्य इमारत सजविण्यासाठी कलात्मक रित्या कोरलेले दगड वापरलेले आहेत आणि भिंती गिलावा करून मुलायम केलेल्या आहेत. कलाकाराणी यातील कला विलोभनीय दिसण्यासाठी गिलावा देताना अतिशय चोखंदळ रित्या बुद्धीचा वापर केलेला आहे आणि उपलब्ध गिलाव्याचे साहित्य उपयोगात आणलेले आहे.[] ही कला इतकी लोकप्रिय झाली की गांधारची ही बुद्ध भव्यता भारत,अफगाणिस्थान, मध्य एशिया आणि चायना पर्यंत पटकन पसरली.

शैलीची उत्क्राती

[संपादन]

ग्रेक्को बुद्धिष्ट कला अतिशय सुंदर आणि वास्तववादी चांगल्या धाटणीची सुरू झाली त्यासाठी त्यांनी या कलेत ग्रीक कलेचा वास्तववादीपणा आणला आणि सत्यता दर्शविण्याचा प्रयत्न केला. पुढील शतकात ही वास्तववादी आधुनिकता लोप पावली आणि तिची जागा प्रतिकात्मक आणि सजावटीने घेतली.[]

पूर्व आशियाचा प्रभाव

[संपादन]

चीन, कोरिया, जपान मध्ये ग्रेको बुद्धिष्ट कलेचा अवलंब केला पण त्यांनी या कलेवर आपल्या बौद्धिक सामर्थ्याने आणि उपलब्ध साधनांनी बदल घडविला. त्यांचे कलेतील मूळं वास्तवता जी शिल्लक राहिली ती अशी :-

  • ग्रीक कलेची आठवण करून देणारी सामान्य वास्तववादी कल्पना
  • ग्रीक धाटणीचा वस्त्र परिधान करतानाचा बारकावा
  • भूमध्य प्रदेशातील कुरळे केश दर्शविले.
  • कांही ठिकाणी पंख पसरून घिरत्या घालणाऱ्या पक्ष्याची गौरव शाली प्रतिकृती.

दक्षिण पूर्व एशियन कला प्रभाव

[संपादन]

या कलेसंदर्भात बहुतेक राष्ट्रावर भारतीय लिखाण आणि संस्कृतीचा त्याचबरोबर हिंदुत्व,महायना,थेरवडा बुद्धिझम यांचा फार मोठा प्रभाव पडला.

संग्रहालये

[संपादन]

मोठ संग्रह

[संपादन]

या कलात्मक प्रतिमेची संग्रहालये खालील देशात आहेत

  • पाकिस्तान:- पेशावर,(जगातील सर्वात मोठे संग्रहालय) लाहोर, तक्षीला, कराची
  • भारत:- कोलकत्ता,मथुरा,
  • फ्रांस:- पॅरिस,[]
  • ग्रेट ब्रिटन:- लंडन,
  • जपान:- तोक्यो,
  • इटली:- रोम,
  • जर्मनी:- बर्लिन,

लहान संग्रह

[संपादन]
  • अमेरिका:- न्यू यॉर्क,
  • जपान:- तोक्यो,
  • ग्रेट ब्रिटन:- लंडन,
  • इटली:- तुरीन,
  • भारत:- न्यू दिल्ली.

खाजगी संग्रह

[संपादन]

बेल्जियम:- ब्रुसेल्स


संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Cultural links between India & the Greco-Roman world".
  2. ^ "Greco-Buddhist art and culture throughout history".[permanent dead link]
  3. ^ "Gandhara artist's lasting contribution to Greco-Buddhist art".
  4. ^ "Timeline of Art History - Gandhara".
  5. ^ "Greco-Buddhism: The unknown influence and contribution of the Greeks".
  6. ^ "France: Musée Guimet and the Greek Buddhas of Gandhara".