Jump to content

कॅरेन गिलन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कॅरेन गिलन

कॅरेन शीला गिलन (२८ नोव्हेंबर १९८७) ही एक स्कॉटिश अभिनेत्री आणि चित्रपट निर्माती आहे. ब्रिटिश चित्रपट आणि दूरदर्शनवरच्या तिच्या कामासाठी, विशेषतः डॉक्टर हू (२०१०-२०१३) या विज्ञान कथा मालिकेतील कामासाठी तिला ओळख मिळाली. तिच्या सुरुवातीच्या चित्रपट भूमिकांमध्ये थरारपट आउटकास्ट (२०१०) मधील अ‍ॅली आणि नॉट अदर हॅपी एंडिंग (२०१३) या प्रणय विनोदी चित्रपटातील जेन लॉकहार्ट या भूमिकांचा समावेश आहे. ब्रिटनमध्ये असताना नाटकातही तिने काम केले. जॉन ऑस्बोर्नच्या इनॅडमिसिबल एव्हिडन्स (२०११) या नाटकात ती दिसली.

गिलानने हॉलीवूडमध्ये ओक्युलस (२०१३) या भयपटात रसेलची भूमिका साकारली. हा चित्रपट युनायटेड स्टेट्समधील तिचे पहिले व्यावसायिक यश होते. त्यानंतर एबीसी सिटकॉम सेल्फी (२०१४) मध्ये मुख्य भूमिका तिने साकारली. गार्डियन्स ऑफ द गॅलेक्सी (२०१४), गार्डियन्स ऑफ द गॅलेक्सी व्हॉल्यूम २ (२०१७), अ‍ॅव्हेंजर्स: इन्फिनिटी वॉर (२०१८), अ‍ॅव्हेंजर्स: एंडगेम (२०१९), थॉर: लव्ह अँड थंडर (२०२२) आणि गार्डियन्स ऑफ द गॅलेक्सी व्हॉल्यूम ३ (२०२३)या मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्स सुपरहिरो चित्रपटांमध्ये नेबुलाची भूमिका करून तिने आंतरराष्ट्रीय ख्याती मिळवली. जुमांजी: वेलकम टू द जंगल (२०१७) आणि जुमांजी: द नेक्स्ट लेव्हल (२०१९), विनोदी चित्रपट गनपाऊडर मिल्कशेक (२०२१) आणि ड्युअल (२०२२) मधील तिच्या दुहेरी भूमिकेसाठी तिची प्रशंसा झाली.

गिलनच्या पुरस्कारांमध्ये एम्पायर अवॉर्ड, नॅशनल टेलिव्हिजन अवॉर्ड, टीन चॉईस अवॉर्ड, ब्रिटिश अकादमी स्कॉटलंड फिल्म अवॉर्ड, क्रिटिक्स चॉइस अवॉर्ड आणि सॅटर्न अवॉर्ड यांचा समावेश आहे. अभिनयाव्यतिरिक्त, तिने द पार्टीज जस्ट बिगिनिंग (२०१८) या नाटक चित्रपटात लेखक आणि दिग्दर्शक म्हणून समीक्षकांची प्रशंसा मिळवली. तिची सार्वजनिक प्रतिमा आणि सक्रियता, विशेषतः आत्महत्या प्रतिबंधकतेसाठी प्रख्यात आहे.

संदर्भ

[संपादन]