Jump to content

कंदिलपुष्प

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कंदिलपुष्प

शास्त्रीय वर्गीकरण
जातकुळी: Ceropegia
जीव: C. vincifolia
शास्त्रीय नाव
Ceropegia vincifolia

कंदिलपुष्प तथा हनुमान बटाटा ही सेरोपेजिया (Ceropegia) गटातील वेलसदृष वनस्पती आहे. या प्रकारच्या अनेक वेली, छोट्या वनस्पती सह्याद्रीतल्या डोंगरदऱ्यांत फक्त पावसाळ्यात वाढतात. []

या वनस्पतीची फुले हनुमानाच्या गदेसारखी असतात,आणि त्यांना जमीनीत एक बटाट्यासारखा कंद असतो. त्यामुळे त्यांना हनुमान बटाटा हे नाव आहे . फुले कंदिलासारखी असल्याने त्यांना कंदिलपुष्प असेही म्हणतात. स्थानिक लोक याला खरतुडी हमण या नावांनेही ओळखतात. या वनस्पती अत्यंत दुर्मिळ आहेत. कंदिलपुष्प वनस्पतींच्या वेगवेगळ्या जातींना वेगवेगळ्या रंगांची सुंदर फुले येतात. यातल्या काही जाती सुंगधीही आहेत. या वनस्पतींना चीक असतो आणि त्यांचे परागीभवन छोट्या कीटकांमार्फत होते. पावसाळ्यानंतर या वनस्पती मरून जातात अन् त्यांचा कंद फक्त जमिनीत शिल्लक राहतो. या कंदापासून पुढच्या वर्षी पुन्हा वनस्पती वाढते .[]

अन्य नावे : कंदील खरचुडी / कंदिलपुष्प / हनुमान गदा Scientific: Ceropegia vincifolia

सह्याद्रीच्या जवळ जवळ सर्वच डोंगरउतारांवर दिसणारी ही वेलवर्गीय वनस्पती आहे. छोट्या झुडपांवर ही पसरते. हा वनस्पतीसमूह आता नामशेष होण्याच्या मार्गाने प्रवास करतो आहे. लोक याचे कंद काढून खातात आणि त्यामुळे ह्यांचे अस्तित्त्व धोक्यात आले आहे. कासच्या पठारावर आणि मेळघाटच्या अरण्यात दर पावसाळ्यात कंदिलपुष्पाची फुले पहायला मिळतात.

  1. ^ "New record to the flora of Gujarat India Ceropegia vincaefolia Hook". Indian Forester. 10 November 2021 रोजी पाहिले.
  2. ^ डॉ. दातार मंदार