उपसागर
Appearance
तीनही बाजूला जमीन असलेल्या समुद्राच्या विशाल जलाशयाला उपसागर म्हणतात. १)बंगालचा उपसागर २)हडसनचा उपसागर (उत्तर अमेरिका) ३) बॅफिनचा उपसागर
हा जलाशय जर विशाल नसेल तर त्याला आखात आणि (बहुधा नदीच्या समुद्राला मिळण्यामुळे झालेला) फारच छोटा जलाशय असेल तर त्याला खाडी म्हणतात. उदा. पर्शियनचे आखात, खंबायतचे आखात, कच्छचे आखात, वगैरे. राजापूरची खाडी, रत्नागिरीची खाडी, महाडची खाडी, भाईंदरची खाडी, माहीमची खाडी, वगैरे.