Jump to content

ॲप्पी फिझ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ॲप्पी फिझ
प्रकार शीत पेय
उत्पादक पार्ले ॲग्रो
मूळ देश भारत भारत


ॲप्पी फिझ हे २००५ मध्ये भारतात दाखल झालेले एक पेय आहे. हे पेय पार्ले अ‍ॅग्रोची निर्मिती आहे. [] ॲप्पी फिझमध्ये कार्बोनेटेड सफरचंदांचा रस असतो आणि कॉकटेलचा आधार म्हणून वापरला जाऊ शकतो. त्यात मद्य नसते. [] ॲप्पीच्या यशानंतर पार्ले अ‍ॅग्रोने सोडा मिश्रित सफरचंदांचा रस म्हणजेच ॲप्पी फिझ बनवले. याचेच सिक्वल प्रॉडक्ट ग्रुपो फिझ पार्ले ॲग्रोने बाजारात आणले. यात सोडा मिश्रित द्राक्षाचा रस आहे. २००५- २००८ मध्ये क्रिकेट सामन्यांमधील याच्या जाहिराती अपयशी ठरल्या होत्या. [] पार्ले अ‍ॅग्रोच्या परवान्याअंतर्गत ग्लोबल बेव्हरेज को. लि.मार्फत बांगलादेशात ॲप्पी फिझ यांची निर्मिती व विक्री केली जाते.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Fruit drinks ready for an encore". द इकोनॉमिक टाइम्स. 2007-02-09. 2006-05-04 रोजी पाहिले.
  2. ^ "Big fizz gets the miss as cola warriors slug it out with fruits". Daily News & Analysis. 2007-08-29. 2008-05-04 रोजी पाहिले.
  3. ^ "Non-traditional Cricket ad firms score high". Business Standard. 2008-02-11. 2008-05-04 रोजी पाहिले.