अॅट्रपिन तथा अॅट्रोपिन हे वनस्पतीमध्ये नैसर्गिकरीत्या सापडणारे एक रसायन आहे. याचे रासायनिक सूत्र C17H23NO3 असे आहे.
अॅट्रोपा बेलाडोना-निसर्गतःच अॅट्रपिन असणारी वनस्पतीअॅट्रपिन रासायनिक आकृती
ॲट्रोपिनअँटीकोलिनर्जिक गटात मोडते. हे प्रामुख्याने नैसर्गिकरित्या धोत्रा आणि बेलाडोना यांसारख्या वनस्पतींपासून मिळवले जाते. वैद्यकीय क्षेत्रात याचा वापर की हृदयविकाराच्या झटक्यादरम्यान कमी झालेली हृदयाची गती (ब्रेडीकार्डिया) वाढवण्यासाठी, शस्त्रक्रियेपूर्वी लाळेचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि डोळ्यांच्या तपासणीवेळी बाहुली रुंद (मायड्रायासिस) करण्यासाठी केला जातो. याव्यतिरिक्त, कीटकनाशकांद्वारे होणारी विषबाधा रोखण्यासाठी ॲट्रोपिन हे एक प्रभावी प्रतिविष म्हणून काम करते. हे औषध जागतिक आरोग्य संघटनेच्या आवश्यक औषधांच्या यादीत समाविष्ट आहे. मात्र याचे अतिप्रमाण झाल्यास तोंड सुकणे, दृष्टी अंधूक होणे आणि हृदयाचे ठोके वेगाने वाढणे असे दुष्परिणाम होऊ शकतात.