भारतीय रुपयाच्या २०१६तील नवीन नोटा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(५०० आणि २००० रुपये किंमतीच्या नव्या नोटा या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

भारत सरकारने वापरात असलेल्या ५०० आणि १००० रुपये किंमतीच्या नोटा ८ नोव्हेंबर २०१६च्या मध्यरात्रीपासून रद्द केल्या आणि त्याजागी ५०० आणि २००० किंमतीच्या नव्या नोटा जारी करण्याचा निर्णय घेतला. या नव्या नोटा अनेक बाबतीत जुन्या नोटांपेक्षा वेगळ्या आहेत, त्यांची वैशिष्ट्ये :-

५०० रुपयाच्या नोटेच्या विशेषता[संपादन]

 • आकारमान ६६ मिमी X १५० मिमी
 • रंग : हिरवटसर राखाडी (स्टोन ग्रे)
 • नोटेच्या दर्शनीय भागात महात्मा गांधीचे उजव्या बाजूला तोंड असणारे छायाचित्र आहे. याआधीच्या नोटेवर गांधींजीचे छायाचित्र हे डाव्या बाजूला तोंड करून होते.
 • आधीच्या नोटेपेक्षा या नोटेचे आकारमान कमी आहे.
 • नोटेच्या मागच्या बाजूला स्वच्छ भारत अभियानाचा लोगो आहे. तसेच लाल किल्ल्याची प्रतिमा आहे.

नजर कमी असलेल्या व्यक्तींसाठी[संपादन]

 • उजव्या बाजूला ५०० या आकड्यासाह एक वर्तुळ उचललेल्या छपाईत
 • उजवीकडे व डावीकडे वर उचललेल्या छपाईत ५ ब्लीड लाईन्स.

२००० रुपयाच्या नोटेच्या विशेषता[संपादन]

 • आकारमान ६६ मिमी X १६६ मिमी
 • रंग: मॅजेंटा (गडद गुलाबी रंग)
 • नोटेच्या दर्शनी भागात भारताने अंतराळात सोडलेल्या मंगलयानाची प्रतिमा.

नजर कमी असलेल्या व्यक्तींसाठी[संपादन]

 • उजव्या बाजूला २००० या आकड्यासह आडवा आयत उचललेल्या छपाईत
 • उजवीकडे व डावीकडे वर उचलेल्या छपाईत ७ ब्लीड लाईन्स

५०० आणि २००० रुपयांच्या नोटांमधील साम्ये[संपादन]

 • मूल्याचा आकड्यांचे आरपार (सी थ्रू) मुद्रण. हा आकडा फक्त नोट प्रकाशाकडे रोखल्यावर दिसतो.
 • मूल्याच्या आकड्याची लपलेली (लेटेंट) प्रतिमा. ही नोट तिरपी केल्यावर दिसते.
 • मूल्याचा आकडा देवनागरी लिपीत.
 • महात्मा गांधीच्या चित्राची बदललेली अभिमुखता तिच्या जागेत बदल. या छापील चित्राखेरीज उजवीकडील कोऱ्या जागेत वाॅटरमार्क स्वरूपात गांधींची प्रतिमा.
 • नोट तिरपी केल्यास सुरक्षा धाग्याचा हिरवा रंग बदलून निळा दिसतो. धाग्यावर छोट्या अक्षरात आरबीआय आणि मूल्याचा आकडा लिहिला आहे.
 • रक्कम अदा करण्याची हमी देणारे वचन, रिझर्व बँकेच्या गव्हर्नरची स्वाक्षरी आणि बँकेचे चिन्ह उजवीकडे सरकविण्यात आले आहे.
 • प्रतिमा आणि इलेक्ट्रोटाईप वॉटर मार्क.
 • संस्था पॅनलवर वाढत्या आकारमानाचे आकडे डावीकडून वर आणि उजवीकडे खाली.
 • आकड्यातील मूल्य रुपयाच्या चिन्हासह रंग बदलणाऱ्या शाईत (हिरव्यावरून निळा), उजवीकडून खाली
 • उजवीकडे अशोक स्तंभाचे चिन्ह.

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]