भारताच्या चलनाचे विमुद्रीकरण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

२०१६मध्ये भारत सरकारने १,००० व ५०० रुपयांच्या चलनी नोटांचे विमुद्रीकरण केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या योजनेची घोषणा केली.[१] त्या योजनेनुसार:

 • दि. ८ नोव्हेंबर २०१६ च्या मध्यरात्रीपासून (००.००तास) भारतातील सर्व बँकांचे एटीएम बंद राहतील. ते दि. ९ व १० नोव्हेंबरलादेखील बंद असतील.[२][३]
 • भारतातील सर्व बँका दि.९ नोव्हेंबर २०१६ला बंद राहतील.[२]
 • दि. ८ नोव्हेंबर २०१६ च्या मध्यरात्रीपासून सध्या भारताच्या चलनात असलेल्या रु. ५०० व १००० च्या सर्व नोटा व्यवहारासाठी बंद करण्यात आल्या आहेत.[२]
 • लवकरच रु.५०० च्या व २००० च्या नवीन नोटा भारताच्या चलनात व व्यवहारात येतील. या नोटा विशेष प्रकारच्या असतील.[२][४][५][६]
 • कोणीही नागरिक त्याचेजवळ असलेल्या जुन्या ५०० व १००० च्या नोटा दि. १० नोव्हेंबर २०१६ ते ३० डिसेंबर २०१६ या कालावधीत कोणत्याही बँकेत अथवा पोस्ट ऑफिसमध्ये भरू शकेल, व त्याऐवजी पर्यायी चलन प्राप्त करू शकेल.[२]
 • त्यानंतर या नोटा दि. ३१ मार्च २०१७ पर्यंत एक प्रतिज्ञापत्र भरून रिझर्व बँकेत जमा करता येतील.[२]
 • सीएनजी गॅस, पेट्रोल पंप, हॉस्पिटल आणि घाऊक बाजारात ११ नोव्हेंबर २०१६पर्यंत जुन्या ५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटा स्वीकारल्या जातील.[२]
 • नोटा बँकेत अथवा पोस्टात बदलण्यासाठी/जमा करण्यासाठी आधार कार्ड/पॅन कार्ड आवश्यक करण्यात आलेले आहे.[२]
 • याद्वारे खोट्या चलनालापण रोध बसणार आहे.[२]
 • काळ्या पैशावर, भ्रष्टाचारावर तसेच मोठ्या प्रमाणात असणाऱ्या बनावट नोटांच्या परिचलनावर याद्वारे आळा बसू शकेल. त्यासोबतच, हत्यारांच्या स्मगलिंकरिताच्या निधीवर, हेरगिरीवर आणि दहशतवादावरही नियंत्रण येईल असा भारत सरकारचा दावा आहे.[७]

यामुळे भारतातील अनेकांना आपली बेहिशेबी संपत्ती नाईलाजाने बँकेत जमा करावी लागली. त्यांची मोठीच पंचाईत झाली.

पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

संदर्भ व नोंदी[संपादन]

 1. ^ एनडीटीव्ही.कॉम "पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात रु. ५०० व रु.१००० च्या नोटा बाद करण्यात येत आहेत (इंग्रजी मजकूर)" Check |दुवा= value (सहाय्य).
 2. ^ a b c d e f g h i "आज मध्यरात्रीपासून 500-1000च्या नोटा वापरातून रद्द, पंतप्रधानांची घोषणा". आयबीएन लोकमत लाईव्ह दूरचित्रवाहिनी. ०८/११/२०१६ रोजी पाहिले. |access-date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
 3. ^ भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या (आर्थिक कर्म विभाग)चे असाधारण राजपत्र क्रमांक-भाग II-खण्ड३-उप-खण्ड (ii) नवी दिल्ली येथे ८ नोव्हेंबर २०१६ ला प्रकाशित
 4. ^ "पहा कशा आहेत २००० च्या आणि ५०० च्या नव्या नोटा". http://zeenews.india.com. External link in |website= (सहाय्य)
 5. ^ "RBI issues Rs. 500 notes in a new series लोकमत, नागपूर-ईपेपर-पान क्रमांक ९,आरबीआयची जाहिरात (इंग्रजी मजकूर)". Archived from the original on 2013-10-23. ०९/११/२०१६ रोजी पाहिले. |access-date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
 6. ^ "RBI issues Rs. 2000 notes in a new series लोकमत, नागपूर-ई-पेपर-पान क्रमांक ३,आरबीआयची जाहिरात पान (इंग्रजी मजकूर)". Archived from the original on 2013-10-23. ०९/११/२०१६ रोजी पाहिले. |access-date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
 7. ^ "वाढता भ्रष्टाचार, काळा पैसा,दहशतवाद आणि बनावट नोटांना आळा घालण्यासाठी भारताचा ऐतिहासिक निर्णय ५०० आणि १००० रुपयांच्या विद्यमान सर्व नोटांवर कायदेशीर बंदी (वित्त मंत्रालय, भारत सरकारची जाहिरात)". लोकमत, नागपूर. नागपूर. Archived from the original on 2013-10-23. ०९/११/२०१६ रोजी पाहिले. |accessdate= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)