२०२३ एसीसी पुरुष चॅलेंजर चषक
Appearance
| २०२३ एसीसी पुरुष चॅलेंजर कप | |
|---|---|
| दिनांक | २४ फेब्रुवारी २०२३ – ५ मार्च २०२३ |
| क्रिकेट प्रकार | ५० षटके |
| स्पर्धा प्रकार | गट राऊंड-रॉबिन आणि नॉकआउट |
| यजमान |
|
| विजेते |
|
| सहभाग | ८ |
| सामने | १५ |
| सर्वाधिक धावा |
|
| सर्वाधिक बळी |
|
२०२३ एसीसी पुरुष चॅलेंजर कप ही एसीसी पुरुष चॅलेंजर कपची उद्घाटन आवृत्ती होती, ज्याचे आयोजन फेब्रुवारी आणि मार्च २०२३ मध्ये थायलंडने केले होते.[१] ही स्पर्धा २०२३ आशिया चषक स्पर्धेच्या पात्रता मार्गाचा एक भाग होती.[१]
या स्पर्धेत आठ संघांनी भाग घेतला, त्यापैकी अव्वल दोन संघ २०२३ एसीसी पुरुष प्रीमियर कपसाठी पात्र ठरले.[२] आशियाई क्रिकेट परिषद (एसीसी) ने ९ फेब्रुवारी २०२३ रोजी स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले.[३]
बहरीन आणि सौदी अरेबियाने दोन उपांत्य सामने जिंकून पुरुष प्रीमियर चषकासाठी पात्र होण्यापूर्वी आपापल्या गटात अव्वल स्थान पटकावले आणि अंतिम फेरीत सौदी अरेबियाने बहरीनचा १० गडी राखून पराभव केला.[४]
संदर्भ
[संपादन]- 1 2 "Thailand Cricket to host ACC Men's Challenger Cup 2023 in February/March". Czarsportz. 16 February 2023 रोजी पाहिले.
- ↑ "Men's cricket team prepares for ACC Men's Challenger Cup 2023". Kuensel. 2023-02-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 10 February 2023 रोजी पाहिले.
- ↑ @ACCMedia1 (9 February 2023). "The ACC Men's Challenger Cup 2023 will be held in Thailand. The 50-over-a-side tournament will take place from February 24th to March 5th 2023. The series provides an opportunity for some of Asia's emerging teams to showcase their talent" (Tweet) – ट्विटर द्वारे.
- ↑ "Saudi Arabia, Bahrain win through ACC Challenger Cup". Cricbuzz. 5 March 2023 रोजी पाहिले.