२०१७ गुरेझ सेक्टर हिमस्खलन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

दिनांक २५ जानेवारी २०१७ ला संध्याकाळी जम्मू आणि काश्मीरच्या गुरेझ क्षेत्रात एकापाठोपाठ एक असे चार हिमस्स्खलन झालेत. या दुर्घटनेत एकूण १९ व्यक्ति मृत्युमुखी पडल्या ज्यात, १५ सैनिक व ४ नागरिक होते.[१][२]

घटना कशी घडली[संपादन]

या अपघातापूर्वी भरपूर बर्फवृष्टी झाली होती.त्यात जम्मू आणि काश्मिरमध्ये अनेक हिमस्खलने झालीत. हा अपघात होण्यापूर्वी, चंदिगड येथील बर्फवृष्टी व हिमस्खलन अभ्यास संस्थेने या हिमस्खलनाची पूर्वसूचना दिली होती.

यातील पहिल्या हिमस्खलनाने दिनांक २५ जानेवारी रोजी सकाळी धडक दिली.यात ४ नागरिकांचे एक कुटुंब मारल्या गेले. याचवेळी दुसऱ्या एका हिमस्खलनाने सोनमर्ग येथे धडक दिली.हे क्षेत्र म्हणजे एक पर्यटनस्थळ आहे, जेथे सैन्यदलाचा तळ आहे. नंतर, यात बर्फात गाडल्या गेलेल्या ७ जवानांना वाचविण्यात यश आले. परंतु, अमित सागर या बर्फात गाडल्या गेलेल्या मेजरला वाचविता आले नाही.

याच दिवशी संध्याकाळी, लागोपाठ दोन हिमस्खलनांनी गुरेझ व्हॅली, जी सोनमर्गपासून १५० किमी अंतरावर आहे, येथे धडक दिली. त्यातील एकाने तिथे असलेल्या सैन्याच्या तळाचे नुकसान केले, तर दुसऱ्याने, पहाऱ्यासाठी बाहेर गेलेल्या एका सैन्यगटास आपले लक्ष्य केले. यातील १० सैनिकांचे मृतदेह बाहेर काढण्यात आलेत, असे भारतीय सैन्यदलाचे निवेदन आहे. किती सैनिक अद्याप बेपत्ता आहेत हे अजूनही स्पष्ट नाही.[३]

दिनांक २८ जानेवारीला यातील अजून चार जवानांचे मृतदेह काढण्यात आलेत. यामुळे जवानांच्या बळीचा आकडा हा १५ झाला आहे.[४]

मेजर श्रीहरी कुगजी[संपादन]

मेजर श्रीहरी कुगजी हे मूळ बेळगावमधील रहिवासी आहेत. जम्मू आणि काश्मिर येथे सैन्यदलात ते आपले कर्तव्य बजावित असतांना हिमस्खलनाने त्यांच्या छावणीचे छप्पर कोसळले. त्याने ते १५ फूट (४.६ मी) बर्फाखाली गाडल्या गेलेत. ते स्थान अशा ठिकाणी होते कि बचाव पथकांना त्यांचा मागमूस लागणे कठिण होते. अशाही परिस्थितीत, त्यांचे हाती लागलेल्या एका कुलुपाने त्यांनी बर्फ फोडून बाहेर मार्ग करण्यास सुरुवात केली. बर्फ फोडून त्या छिद्रातून त्यांचे बाहेर आलेले बोट बचाव पथकास दिसले व त्यांनी मेजर यांना बाहेर काढले. त्यांनी बर्फ फोडण्याचे प्रयत्न सुमारे तीन तास केलेत.[५]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ एनडीटीव्ही.कॉम हे संकेतस्थळ (इंग्रजी मजकूर), Gurez Avalanche accident ,. २६ जानेवारी २०१७. २९ जानेवारी २०१७ रोजी पाहिले. 
  2. ^ एनडीटीव्ही.कॉम हे संकेतस्थळ (इंग्रजी मजकूर), Gurez death toll rises ,. २७/०१/२०१७. २९/०१/२०१७ रोजी पाहिले. 
  3. ^ एनडीटीव्ही.कॉम हे संकेतस्थळ (इंग्रजी मजकूर) Gurez Avalanche accident. २६ जानेवारी २०१७. २९ जानेवारी २०१७ रोजी पाहिले. 
  4. ^ एनडीटीव्ही.कॉम हे संकेतस्थळ (इंग्रजी मजकूर) Gurez death toll rises. २७ जानेवारी २०१७. २९ जानेवारी २०१७ रोजी पाहिले. 
  5. ^ लोकमत,नागपूर-ई-पेपर- दिनांक २९/०१/२०१७, पान क्रमांक ८ , हिमस्खलनात गाडले गेले:पण १५ फूट बर्फ कुलुपाने फोडला-मेजर कुगजीपुढे मृत्यूनेही टेकले गुडघे. लोकमत मीडिया प्रायव्हेट लि. नागपूर. दिनांक २९/०१/२०१७ रोजी पाहिले.