१९९७चे आशियाई आर्थिक संकट
या संकटाची सुरुवात थायलंड मध्ये झाली. या संकटाचा सर्वात मोठा फटका इंडोनेशिया, साउथ कोरिया आणि थायलंड या देशांना बसला होता. जपानला देखील या संकटाची झळ बसली.
थायलंड[संपादन]
१९८५ ते १९९६ दरम्यान थायलंडची अर्थव्यवस्था दरवर्षी ९% दराने विकसित झाली. ६००००० परदेशी कामगारांना त्यांच्या मायदेशी पाठवण्यात आलं. थायलंडचा शेअर बाजार ७५%नी गडगडला. या संकटातून बाहेर पडण्यासाठी ११ ऑगस्ट १९९७ला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने थायलंडला १७०० कोटी अमेरिकन डॉलरच्या आर्थिक मदतीची घोषणा केली.
इंडोनेशिया[संपादन]
३० वर्ष सत्तेत असलेल्या राष्ट्राध्यक्ष सुहार्तोना २१ मे १९९८ला राजीनामा द्यायला भाग पाडण्यात आले.