होरेस ग्रीली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

होरेस ग्रीली (३ फेब्रुवारी, इ.स. १८११:ॲम्हर्स्ट, न्यू हॅम्पशायर, अमेरिका - २९ नोव्हेंबर, इ.स. १८७२:प्लेझंटव्हिल, न्यू यॉर्क, अमेरिका) हा अमेरिकन पत्रकार होता. याने न्यू-यॉर्क ट्रिब्यून या वर्तमानपत्राची स्थापना केली व अनेक वर्षे हा त्याचा संपादक होता. हा अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहात न्यू यॉर्क राज्यातून तीन महिन्यासाठी निवडून गेला होता. ग्रीली १८७२च्या राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीत लिबरल रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार होता. यात तो मोठ्या फरकाने युलिसिस एस. ग्रँटकडून पराभूत झाला. निवडणुकीच्या पाच दिवस आधी त्याची पत्नी वारल्यावर ग्रीली अतिशय दुःखित झाला व तीन आठवड्याने स्वतः मृत्यू पावला.

हे सुद्धा पहा[संपादन]