हॉकर सी हॉक
Appearance
हॉकर सी हॉक हे एक ब्रिटिश बनावटीचे आरमारी लढाऊ विमान आहे. याची रचना १९५० च्या दशकात हॉकर एरक्राफ्ट आणि तिची उपकंपनी आर्मस्ट्राँग व्हिटवर्थ एरक्राफ्ट या या कंपन्यानी केली. या विमानांचा वापर रॉयल नेव्ही, भारतीय, जर्मन तसेच नेदरलँड्सच्या आरमारांनी केला. याचे शेवटचे नमूने भारतीय आरमाराने १९८३मध्ये निवृत्त केले.
एक चालक आणि एक इंजिन असणारी ही विमाने विमानवाहू नौकांवर ठाण मांडून असत.